esakal
नाशिक

Nashik Crime News : दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दरोडाच्या तयारीत असलेल्या पिकअपसह पाच जणांचा मुसळगाव येथील पोलिसांनी मुस्क्या आवळ्या असून या पाच जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की धारदार हत्यारासह पिकअप, मोटारसायकल, याशिवाय चार मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ( Gang preparing for robbery arrested nashik crime news )

पोलिसांनी भूषण ज्ञानेश्वर पाटील (२९, रा. जोशीवाडी, सिन्नर), सचिन संजय जगताप (२७, रा. गणेशनगर, मुसळगाव एमआयडीसी), प्रतीक संजय रॉय (२९, रा. उज्ज्वलनगर, सिन्नर), कुमार तेजबली सिंग (१५, रा. गणेशनगर, मुसळगाव, मूळ रा. मध्य प्रदेश), विलास शंकर उरकुडे (२९, रा. गणेशनगर, मूळ रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले.

पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस शिपाई विक्रम टिळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली असून दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीच पोलिसांनी पकडल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील बारागाव पिंप्री- हिवरगाव रस्त्यावरील मुक्ताई लॉन्ससमोर संशयितरीत्या फिरणारी पिकअप रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडली असून दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच युवकांच्या टोळीला धारदार शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी पिकअपसह एक मोटारसायकल, धारदार शस्त्रांसह मोबाईल असा ४ लाख ३१ हजारांचा मुद्देमालही जप्त केला आहे. बारागाव पिंप्री येथील बंधन टेक्सटाईल या दुकानात चोरी करण्याचा या पाच चोरट्यांचा प्रयत्न गस्तीवर आलेल्या पोलीस पथकामुळे अयशस्वी झाला.

पुढे जाणारी पिकअप पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्याकडे आढळलेल्या धारदार शस्त्रांमुळे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळीच पोलिसांच्या हाती लागली.

पोलिसांनी तीन फूट लांबीची लोखंडी पहार (कटावणी), टामी, २४ इंची पाण्याची कैची सव्वा फूट लांबीचा कोयता, एक फूट लांबीचा स्क्रू ड्रायव्हर, एक पकड़ या टोळीकडून जप्त केली असून महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्र. एम.एच.४८ / टी-२४७७) व होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एम. एच. १५/ जी. एम. ६३३४) ही जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

Bhaubeej 2025 Marathi Wishes: भाऊबीजनिमित्त लाडक्या भावा-बहिणीला पाठवा मराठीतून हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक सुंदर संदेश

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

SCROLL FOR NEXT