govind chikhale2.png
govind chikhale2.png 
नाशिक

12 वर्षांनंतर मिळाली नोकरी?...कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा...!

उमेश देशमुख : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सीएमओ म्हणजेच मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार दाखल करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला महावितरण विभागाने तब्बल 12 वर्षांनंतर कामावर पुन्हा रुजू करून घेतले आहे. त्यामुळे न्याय मिळालेला कर्मचारी अन्‌ त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गोविंद शिवराम चिखले असे कामावर रुजू करून घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

दाद मिळत नसल्याने थेट मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार अर्ज

22 मे 1996 ला वाहिनी मदतनीस म्हणून ते या विभागात रुजू झाले होते. मात्र 2008 मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांचे अनुसूचित जमातीचे पत्र अवैध ठरविले. त्यामुळे त्यांची सेवा 10 मार्च 2008 पासून अवैध ठरवत समाप्त झाली. या संदर्भात राज्य शासनाने जात प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या कर्मचाऱ्यासाठी अधिसंख्या पदे निर्माण करून संबंधित कर्मचाऱ्यांना अधिसंख्यापदावर तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांची नेमणूक द्यावी, असा आदेश असलेले परिपत्रक काढले. परिपत्रकाच्या आधारावर चिखले महावितरण विभागातील अधिकारी वर्गाकडे कामावर रुजू करून घ्यावे, यासाठी चकरा मारत होते. अधिकारी वर्ग दाद देत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार अर्ज दिला. याप्रश्‍नी सचिवालयाने महावितरणकडे पाठपुरावा करीत विचारणा केली. त्याचा परिणाम म्हणून महावितरणला श्री. चिखले यांना पुन्हा कामावर रुजू करावे लागले. 

34 टक्के तक्रारदारांना न्याय 

मुख्यमंत्री सचिवालयात दाखल झालेल्या 342 तक्रार पैकी 200 अर्जांचा आढावा घेतला आहे. यांपैकी 60 अर्ज मंत्रालयस्तरावरील असून, ते पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले आहेत. उर्वरित 140 अर्जांचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे. यामध्ये 48 अर्ज निकाली निघाले आहेत. उरलेल्या 102 अर्जांचा पाठपुरावा केला जातो आहे. सचिवालयात दाखल झालेल्या अर्जदारांपैकी 36 टक्के अर्जदारांना न्याय मिळाला आहे. 

नेत्रचिकित्सकांचे सर्व्हिस बुक भरले 

धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्रचिकित्सक या पदावर विक्रम कौतिक सैंदाणे सेवेत आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांचे सर्व्हिस बुक भरले गेले नाही. मुख्यमंत्री सचिवालयात त्यांनी तक्रार अर्ज दाखल केला. सचिवालयाच्या पाठपुराव्याने सैंदाणे यांच्या 12 वर्षांच्या नोंदी संबंधितांना कराव्या लागल्या आहेत. 

मुख्यमंत्री सचिवालयात पाच जिल्ह्यांतील नागरिक आपली समस्या मांडत आहेत. त्यांना आमच्याकडून तातडीने न्याय दिला जातो आहे. नागरिकांचे समाधान होऊन त्यांचा आनंदी चेहरा म्हणजे आमच्या कामाची पोच आहे. - दिलीप स्वामी, विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय 

मुख्यमंत्री सचिवालयाच्या पाठपुराव्याने पुन्हा महावितरणमध्ये नोकरी मिळाली. या विभागातील अधिकारी वर्गाला मनःपूर्वक धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएमओ संकल्पना राबविली. त्यांनाही याचे श्रेय आहेच. - गोविंद चिखले, वाहिनी मदतनीस, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT