इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत असून सोमवारी (ता.४) माघारीची मुदत होती. या माघार प्रक्रियेत अवघ्या चार जागा बिनविरोध झाल्या; तर १९ उमेदवारांनी माघार घेतली.
कुठे माघारीसाठी प्रयत्न तर, कुठे मनधरणी
विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे टिटोली ग्रामपंचायतीत ७ जागांसाठी ७ अर्ज असल्याने यापूर्वीच ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली; तर बलायदुरी व फांगुळगव्हाण येथे आरक्षित जागेसाठी उमेदवारी अर्ज न आल्याने प्रत्येकी ४ व ५ अशा ९ जागा रिक्त राहिल्या. त्यामुळे आता सात ग्रामपंचायतींच्या ४४ जागांसाठी १०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहे.
आज (ता.४) माघारीची प्रक्रिया असल्याने तहसील कार्यालय परिसरात काहीशी गर्दी होती. कुठे माघारीसाठी प्रयत्न तर, कुठे मनधरणी सुरू असल्याचे चित्र जाणवत होते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीनुसार कुर्नोली व तळोघ येथे सरळ लढत तर भरविर बुद्रूक ग्रामपंचायतीत रंगदार निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, माघारीसाठी अनेकांनी इच्छूक उमेदवारांची माघारीसाठी मनधरणी केली. मात्र, यंदा निवडणुक लढवायचीच अशी ठाम भूमिका सात ग्रामपंचायतील उमेदवारांनी घेतल्याने आता ‘होऊन जाऊ द्या ची भूमिका’ वर प्रचाराचे वारे वाहू लागणार आहे.
हेही वाचा > साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच; बाईकवरून शिर्डीवर निघालेल्या तीन तरुणांवर काळाचा घाला
अशी आहे स्थिती
टिटोली - बिनविरोध, तळोघ ९ जागांसाठी १८ उमेदवार, शेणवड खुर्द ७ जागांसाठी २० उमेदवार, कुर्नोली ४ जागांसाठी ८ उमेदवार, भरविर बु. येथे ११ जागांसाठी २६ उमेदवार, गरुडेश्वर येथे ७ जागांसाठी २० उमेदवार, बलायदुरीत ३ जागांसाठी ७ उमेदवार, तर फांगुळगव्हाण येथेही ३ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. फांगुळगव्हान व बलायदुरी येथे प्रत्येकी ५ व ५ जागांसाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याने या आरक्षित जागांसाठी उमेदवारी अर्जच प्राप्त न झाल्याने या जागा रिक्त राहील्या.
हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.