grapes will be available in January nashik news
grapes will be available in January nashik news 
नाशिक

Grapes Season: जानेवारीत मिळणार द्राक्षांचा गोडवा; निर्यातीचा टक्का वाढण्याची शक्यता

एस. डी. आहिरे ः सकाळ वृत्तसेवा

Grapes Season : जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या द्राक्षबागांची गोड्या बहार छाटणी पूर्ण झाली आहे. परतीच्या पावसाने उघडीप दिल्याने फुलोरा व द्राक्ष लगडण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्षबागा कधी नव्हे एवढ्या जोमात बहरल्या आहेत.

त्यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात खवय्यांच्या जिभेवर गोडवा पेरतील. अनुकूल वातावरण राहिल्याने औषध फवारणी कमी होऊन खर्चात बचत होण्याबरोबरच ‘रेसिड्यू फ्री’ द्राक्षांचे क्षेत्र अधिक प्रमाणात राहणार असून, निर्यातीचा टक्का वाढण्याची चिन्हे आहेत. (grapes will be available in January nashik news)

रसाळ, गोड द्राक्षांच्या बागा यंदा फुलल्या आहेत. पावसाचा मुक्काम न लांबल्याने शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने गोड्या बहार छाटणी करता आली. शिवाय थंडीचे आगमन काही दिवसांसाठी लांबल्याने फुलोऱ्यातील बागांमध्ये दर्जेदार फळ येण्याची चिन्ह आहेत.

वातावरणाचा अडथळा नसल्याने द्राक्ष उत्पादकांनी यंदा निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या छाटणी होऊ दीड महिना उलटला आहे. फुलोरा व मणी लगडण्याच्या अवस्थेत बागा आहेत. प्रत्येक झाडावर ३५ ते ४० घड दिसत आहेत. पाऊस, थंडी नसल्याने रोगाचे आक्रमण अद्याप तरी झालेले नाही.

पोषक वातावरणामुळे फुगवणीव्यतिरिक्त अतिरिक्त कीटकनाशक, बुरशीनाशक औषध फवारणीची वेळ आलेली नाही. त्याचा परिणाम औषधांचा अंश नसलेले (रेसिड्यू फ्री) द्राक्षाचे नमुने अधिक संख्येने निर्यातीसाठी प्रमाणित होण्याची चिन्ह आहेत. पूरक स्थितीमुळे औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे. शिवाय सातासमुद्रापार द्राक्ष निर्यात करण्याची संधी शेतकऱ्यांना अधिक खुणावते आहे. टप्प्याटप्प्याने बागांची छाटणी झाल्याने बंपर पीक बाजारात येण्याची चिन्हे नाहीत.

दहा हजार कंटेनर निर्यातीची शक्यता

मागील वर्षी महाराष्ट्रातून आठ हजार ५०० कंटेनर द्राक्ष युरोप, रशिया येथे निर्यात झाले. यंदा परदेशातून मागणी वाढण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात निर्यातदारांनी यंदा तयारी दाखविली आहे. यंदा दहा हजार कंटेनरचा टप्पा पार होण्याची चिन्हे आहेत.

त्यातील सात हजार द्राक्ष कंटेनर नाशिक जिल्ह्यातून निर्यात होण्याची शक्यता आहे. यातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळू शकते. उत्तर भारतात थंडीची लाट न आल्यास उठाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करण्याची शक्यता आहे.

एकरी ११० क्विंटल उत्पन्न अपेक्षित

विविध संकटांशी सामना करून खवय्यांच्या पसंतीला उतरतील अशी रसाळ द्राक्ष पिकविण्यात नाशिकच्या शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. निफाड, दिंडोरी, नाशिक परिसरात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टप्प्याटप्प्याने छाटणी झाली. बागलाणमध्ये आगाप छाटणीमुळे तेथील द्राक्ष बाजारात दाखल झाली असून, निर्यातीसाठी १२५ रुपये किलो दर त्यांना मिळत आहे. निफाडसह परिसरातील द्राक्ष जानेवारीच्या मध्यावर परिपक्व होऊन खवय्यांचे तोंड गोड करतील. एकरी ११० क्विंटल द्राक्ष उत्पादन अपेक्षित आहे.

"परतीचा पाऊस न झाल्याने द्राक्ष हंगामासाठी पूरक ठरले आहे. रोगांचा प्रादुर्भाव नसल्याने अतिविषारी औषध फवारणी करण्याची वेळ आली नाही. त्यामुळे निर्यातीसाठी अधिक बागांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. निर्यातदार व्यापाऱ्यांची हालचाली पाहता टक्का वाढू शकतो. चांगल्या बाजारभावाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे." -सुनील जाधव, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत

"मागील वर्षी महाराष्ट्रातून निर्यात झालेली साडेआठ हजार कंटेनर द्राक्ष परदेशी खवय्यांच्या पसंतीला उतरली आहेत. त्यामुळे यंदा युरोप, रशियामधून मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच शेतकऱ्यांनी यंदा कमी प्रमाणात कीटकनाशके फवारल्याने निर्यातीसाठी ही बाब पूरक आहे. दहा हजार कंटेनर निर्यातीचा अंदाज आहे." -लक्ष्मण सावळकर, द्राक्ष निर्यातदार, मॅग्नस पार्म फ्रेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM: "मतमोजणी वेळी RO अधिकारी वॉशरूममध्ये जाऊन..." अनिल परब यांचे मोबाईल बदल प्रकरणी मोठे आरोप

Amboli Ghat : आंबोलीतला 'हा' धबधबा झाला प्रवाहित; घाटात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस, हिरण्यकेशीला मोठ्या प्रमाणात पाणी

Snake In Car : मुंबईकरांनो सावधान कारच्या बोनेट,संस्पेशनमध्ये असू शकतो 'साप'

Lost Mobile : मोबाईल हरविल्यास चिंता सोडा.! केंद्राची यंत्रणा ठरतेय फायदेशीर; महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

Jayant Patil: या 8 गावांवर विशाल-विश्वजित यांचे विशेष लक्ष, जयंत पाटलांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चे नियोजन?

SCROLL FOR NEXT