bhushan khairnar esakal
नाशिक

एक पाय गमावला तरीही विचारांच्‍या शक्‍तीच्‍या जोरावर भूषण ठरतोय 'रोल मॉडेल'!

अरूण मलाणी

नाशिक : सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार (corona pandemic) सुरू असताना प्रत्‍येक जण भयभीत आहे. पण विचारांच्‍या शक्‍तीच्‍या जोरावर (strength of the power) अशक्‍य गोष्टदेखील शक्‍य करता येऊ शकते, हे नाशिकचाच भूमिपुत्र भूषण खैरनार या सत्तावीस वर्षीय तरुणाने आपला एक पाय गमावला असूनही सउदाहरण सिद्ध केले आहे. (Bhushan gives Encouragement to others)

विचारांच्‍या शक्‍तीतून थक्‍क करणारा आजपर्यंतचा प्रवास

अठरा वर्षांचा असताना अपघातात एक पाय गमावला. नंतरच्‍या कालावधीतही आलेल्‍या संकटावर स्‍वार होत भूषण मोटिव्हेशनल ट्रेनर, समुपदेशक म्‍हणून इतरांना प्रोत्‍साहन देत आहेउपचार घेणारे कोरोनाबाधित अन्‌ कोरोनाच्‍या भीतीखाली जगत असलेल्‍या अशा दोन्‍ही प्रकारच्‍या लोकांना भूषणचा प्रवास नक्‍कीच प्रेरणादायी ठरेल. मुळचा मालेगाव येथील असलेल्या भूषणच्या आयुष्यात घडलेल्‍या छोट्याशा प्रसंगाने त्‍याचे जीवन बदलले. दहावीच्‍या सुटीत मामाच्‍या गावाला जायचे म्‍हणून बॅग घेण्यासाठी बाजारपेठेत गेलेल्‍या भूषणची नजर एका पुस्‍तकावर पडली. बॅग घेण्यापेक्षा धीरूभाईजम या पुस्‍तक खरेदीला सोळावर्षीय मुलाने प्राधान्‍य दिले. पुस्‍तक वाचनाची गोडी तर लागलीच. सोबत सकारात्‍मक विचारांचे आपल्‍या आयुष्यात काय बदल घडवू शकतात, याची जाणीवदेखील झाली. पुढे नाशिकच्‍या केटीएचएम महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण करत पुण्यातील एमआयटीत अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. शिक्षणासोबत सॉफ्टवेअर मार्केटिंग क्षेत्रात कमी वयात योगदान देण्यास सुरवात केली.

संकटावर स्‍वार झालेल्या भूषणकडून इतरांना प्रोत्‍साहन

सहा महिन्‍यांतच पदोन्नतीतून तो प्रशिक्षक (ट्रेनर) झाला. अभियांत्रिकीच्‍या द्वितीय वर्षात असताना ३१ ऑक्‍टोबर २०१२ मध्ये पुण्याहून मनमाडला पॅसेंजरने येत असताना झालेल्‍या अपघातात त्‍याला पाय गमवावा लागला. काही दिवसांसाठी नकारात्‍मक विचारांचा सामना करावा लागला तरी सकारात्‍मक विचारांच्‍या जोरावर त्‍याने यशस्‍वी वाटचाल सुरू ठेवली. अभियांत्रिकीचे शिक्षण पुढे सुरू ठेवता आले नाही, तरी सीएमसीएस महाविद्यालयातून बीबीए व नंतर ह्युमन रिसोर्स (एचआर) विषयांतून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.

पुन्‍हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू

अपघाताच्‍या दिवशी झालेल्‍या शस्त्रक्रियेत पाय गमाविल्‍यानंतर ७ नोव्‍हेंबर २०१२ च्‍या दुसऱ्या शस्त्रक्रियेत पायाला पन्नास टाके दिले. शारीरिक व मानसिकरित्‍या या संपूर्ण परीस्‍थितीतून बाहेर येण्यास किमान सात-आठ महिने लागतील, असे डॉक्‍टरांनी सांगितले. पण या सर्वांमधून २१ दिवसांत बाहेर पडायचा दृढ निश्‍चय करत, भूषणने ते करूनही दाखविले. २८ नोव्‍हेंबर २०१८ ला तो पुण्यात दोनशे लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्‍यांच्‍यासमोर जाऊन उभा होता. २०१८ मध्ये शिवजयंतीनिमित्त त्‍याने कसलाही आधार न घेता एका पायावर रामशेज सर करत विचारांमधील ताकद पुन्‍हा एकदा सिद्ध करून दाखविली.

ट्रेनर, समुपदेशनाचे काम अविरत सुरू

देशभरात चारशेहून अधिक कार्यक्रमांत सहभागी झालेल्या भूषणचा जोश टॉकवरील व्‍हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. कोरोना काळात खचलेल्‍या व्‍यक्‍तींना मोफत समुपदेशनाची त्‍याची तयारी असून, आवश्‍यकता असलेल्‍या व्‍यक्‍तींनी ९४०३४१०२६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Associated Media Ids : NCTY21B03723

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray Statue Vandalised : मीनाताईंच्या पुतळ्यावर रंगफेक; ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबईत तणाव वाढला

Pune News : अंगणवाड्यांची धोकादायक स्थिती; बालशिक्षण धोक्यात; दाटीवाटीत मुलांचे शिक्षण, सुरक्षिततेचा प्रश्न

Share Market मध्ये नुकसान झालं नाशिकच्या दोन पठ्ठ्यांनी असा मार्ग निवडला की पोलिसांनीही डोक्याला हात मारला; नेमकं काय घडलं?

Robbery At SBI Bank : स्टेट बँकेच्या शाखेवर पिस्तूल, चाकूने धमकावून दरोडा, आठ कोटींचा ऐवज लुटला, पोलीस घटनास्थळी दाखल

Navratri 2025 Do's and Don'ts: शारदीय नवरात्रात काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT