Heavy rains  esakal
नाशिक

वरुणराजाची धुवांधार ‘बॅटिंग'; हवामान विभागाचा 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

- गोदावरी नदीला यंदा पहिला पूर,रामसेतू पाण्याखाली. - नद्या काठच्या रहिवाशांना खबरदारीची सूचना

- रामकुंड भागातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी - गोदावरीच्या पुरात अडकलेल्या ६५ जणांची सुटका

- सप्तशृंगीदेवी गडावरील ढगफुटीमध्ये ५ भाविक जखमी - पळशी (ता. पेठ) ते चिखली दरम्यान नाल्यात एक जण वाहून गेला

- सप्तशृंगीदेवी गडावर परतीच्या मार्गावर कठडा गेला वाहून - बागलाणमधील आदिवासी पट्यातील गावांचा तुटला संपर्क

- धुळ्याचे राज्य राखीव दलाचे पथक नाशिककडे रवाना - गंगापूर, दारणा, नांदूरमधमेश्‍वर, कडवा, चणकापूर, पूनंद, पालखेड धरणातून विसर्ग

- होळकर पुलाखालून १३ हजार ४२३ क्युसेसचा विसर्ग - ठेंगोडा बंधाऱ्याचा २६ हजार ९०० क्युसेस विसर्ग

- गोदावरी, गिरणा, कादवा, म्हाळुंगी, तास, मोसमला पूर. - सुरगाणा तालुक्यातील पश्‍चिम वाहिन्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

- सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिवृष्टी - सावकी ते विठेवाडी (ता. देवळा) पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद (heavy rain in district Meteorological Department warns of 3 days of heavy rain Nashik Latest Monsoon News)

- रवळस-पिंपरी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली. - सायखेडाजवळ रस्त्यावर झाड कोसळले आहे. बाणगंगा नदीला पूर.

- खडकसुकेणे- जोपूळ मार्गावर कादवावरील पूल पाण्याखाली - दिंडोरी तालुक्यातील ७ रस्ते पाण्याखाली उनंदा, कादवा, देवनदीललापूर

- शिरसगाव ते मुरंबी (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पूल पाण्याखाली - ठाणगाव (ता. सिन्नर) येथील काळेवाडीचा पूल पाण्याखाली

- म्हाळुंगी नदीला यंदा आलाय पहिला पूर - साल्हेरजवळून जाणाऱ्या रस्त्याचार भराव खचला

- निफाडमधील संगमेश्‍वर देवस्थानला पाण्याचा वेढा - सुरगाण्यातील राक्षसभुवन जवळचा पूल पाण्याखाली. महाराष्ट्र-गुजरात संपर्क तुटला

- हस्ते-बाऱ्हे घाटात दरड कोसळली. गावांचा तुटला संपर्क - बाऱ्हे-दांडीची बारी रस्त्यात झाड कोसळल्याने गावांचा तुटला संपर्क

- इगतपुरीमध्ये अतिक्रमणामुळे नाले-गटारींचे पाणी शिरले घरात - नांदगावमधील सबवेमधील साचणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर.

- मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीला शाळा सुटीचा अधिकार. - त्र्यंबकेश्‍वर शहरात गल्ल्यांमधील पाणी घराघरांमध्ये.

"जिल्ह्यात तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्यास जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु राहणार आहे. अशा स्थितीत नदीकाठच्या नागरिकांनी पूरापासून सावधगिरी बाळगावी. पूर पहाण्यासाठी गर्दी करु नये. सेल्फी काढण्याचा मोह टाळावा." - गंगाथरण. डी (नाशिकचे जिल्हाधिकारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT