esakal
esakal
नाशिक

HSC Result 2023 : पोरांची हुशारी घसरली! निकालात 2 टक्के घट, 211 अनुत्तीर्ण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दोन-तीन वर्षे निकालाची उड्डाणे घेतली गेली. मात्र यंदा बारावीच्या निकालात तालुक्यात सरासरी दोन टक्के घट झाली. परीक्षेला बसलेल्या चार हजार २७० विद्यार्थ्यांपैकी तब्बल चार हजार ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्याचा सरासरी निकाल ९५.५ टक्के लागला. विशेष म्हणजे विविध महाविद्यालयांच्या २३ शाखांचा निकाल शंभर टक्के लागला. (hsc result 2023 2 percent drop in results 211 failed yeola nashik news )

दर वर्षीच निकालाचे आकडे फुगत असले तरीही यंदा खरोखरच हुशार विद्यार्थ्यांना निकालाने साथ दिली. इंग्रजी व इतर कठीण विषयाने साथ न दिल्याने २११ विद्यार्थ्यांची बत्ती गुल झाली. तालुक्याचा बारावीचा निकाल २०१६ मध्ये ८१, २०१७ मध्ये ९०, तर २०१८ मध्ये ९१.१४ टक्के होता.

शाळा तेथे केंद्रामुळे अनपेक्षितपणे विक्रमी वाढ होऊन गेल्या वर्षी ९६.७८ टक्के निकाल लागला. पण यंदा दोन टक्के घट झाली. विशेष म्हणजे या वर्षी २८ कनिष्ठ महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेल्या चार हजार ५९ विद्यार्थ्यांपैकी ९५८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर एक हजार ९७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले.

यंदा विज्ञान शाखेसोबतच कला व वाणिज्य शाखेनेही बाजी मारली. नेहमीच पहिला क्रमांक सांभाळणाऱ्या शहरातील विद्यालयाशी बरोबरी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानीही बाजी मारली.

शहरातील स्वामी मुक्तानंद, एन्झोकेम, जनता शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुणांचे मजले पार केलेच; पण बाभूळगाव येथील संतोष ज्युनिअर कॉलेज, राजापूर येथील विद्यालय, अंदरसूल येथील मातोश्री शाळेचे विद्यार्थी तालुक्यात टॉपवर आले. सावरगाव, नगरसूल, पाटोदा, एरंडगाव, अंदरसूल, राजापूर येथील महाविद्यालयांचा निकाल नेहमीप्रमाणे चांगला लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा लागला निकाल

येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा विज्ञान, कला, वाणिज्य शाखेचा मिळून ९३.७५, तर किमान कौशल्यचा १००, एन्झोकेम विद्यालयाचा ९५.८०, जनता विज्ञान विद्यालयाचा निकाल ९८.७५ टक्के, कला वाणिज्यचा ८१.५६ टक्के निकाल लागला.

अँग्लो ऊर्दूचा ७०.५८, बाभूळगावच्या संतोष विद्यालयाचा एकत्रित ९९.३८, एसएनडी महाविद्यालयाचा ९२.८५, एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा ९७.५६, नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलचा ९७.५१ व किमान कौशल्यचा ८७.२७, पाटोदा जनता विद्यालयाचा एकत्रित ९३.२०,

रहाडीच्या संतोष विद्यालयाचा ८९.४४, तर जळगाव नेऊरचा १०० टक्के, सावरगाव न्यू इंग्लिश स्कूलचा ९१.११, राजापूर येथील माध्यमिक विद्यालयाचा ९७.८२, अंदरसूल येथील मातोश्री सोनवणे विद्यालयाचा ९५.३०, येवला ऊर्दूचा ९७.५६, राजापूरच्या गणाधीशचा ९९, सायगवाच्या सरस्वती विद्यालयाचा ९४.११,

भाटगावच्या विश्वलताचा १००, सोनवणे हायस्कूल अंकाई ९८.९१, कंचनसुधा ज्युनिअर कॉलेजचा ९९.७, आत्मा मालिकचा १००, धानोरे येथील विद्या इंटरनशनल शाळेचा विज्ञानचा १०० टक्के निकाल लागला. निकालाची टक्केवारी वाढून सर्वच शाळांचे आकडे समाधानकारक असल्याचे दिसून येत असताना विद्यार्थीदेखील खूपच हुशार झाल्याचे आकड्यांतून दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT