Hudhudi bharli Temperature at 12 degrees
Hudhudi bharli Temperature at 12 degrees  sakal
नाशिक

नाशिक : हुडहुडी भरली; तापमान १२ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहूल लागली खरी. मात्र डिसेंबरच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्यानंतर थंडी गायब झाली होती. आता पुन्हा थंडीचा जोर वाढला असून, गेल्या दहा दिवसांत सर्वांत कमी तापमानाची(Temperature) नोंद रविवारी (ता. १९) झाली. तापमान(Temperature) १२.५ अंशांवर पोचले आहे. त्यामुळे नाशिककरांना हुडहुडी(nashik cold) भरली असून, नागरिकांची पावले सायकलिंग, जॉगिंग ट्रॅककडे वळल्याचे दिसत आहे.

थंडी वाढू लागल्याने शहरातील विविध भागातील रस्त्यांवर सकाळी, सायंकाळीही उबदार कपडे घालून चालणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरात शनिवारी १३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी १३.८ अंश तापमान नोंदविले गेले. शहरातील सर्व जॉगिंग ट्रॅकमध्ये गर्दी दिसत आहे. शिवाय शहरातील जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरमध्ये गर्दी दिसत आहे. थंडी वाढल्याने तरुणांकडून व्यायामावर भर दिला जात आहे. नाशिकच्या किमान तापमानात दोन दिवसांत दोन अंशांनी घट झाली. कमाल तापमानही ३० अंशांच्या खाली राहत असल्यामुळे दिवसभर गारठा जाणवत आहे. यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नोव्हेंबरमध्येही तापमानाचा पारा १२ अंशांवर खाली आला होता.

असे होते आठवड्यातील तापमान

गेल्या आठवड्यात तापमान स्थिर होते. त्यामुळे गारठा जाणवला नाही. शुक्रवारी १३.८ अंश, गुरुवारी १४.५, बुधवारी १५.८, मंगळवारी १४.५, सोमवारी १५.८ अंश तापमान नोंदविले गेले. गुरुवारी १४ असलेल्या तापमानात रविवारी दोन अंशांनी घट होत तापमान १२ अंशांवर आले आहे.

व्यायामावर दिला जातोय भर

कोरोनामुळे नागरिक सजग झाले असून, आता थंडी पडत असल्यामुळे नागरिकांनीही व्यायाम करण्यावर भर दिला आहे. शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, कृषीनगर, गोदा पार्क, तपोवन परिसर, गंगापूर रोड, सोमेश्वर आदी ठिकाणी नागरिकांची सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे. शहरातील विविध उद्यानांमध्ये ओपन जिम असल्यामुळे तिकडेही नागरिकांची पावले वळल्याचे चित्र आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: आवेशने एकाच ओव्हरमध्ये पंजाबला दिले दुहेरी धक्के! धोकादायक रुसो पाठोपाठ शशांक सिंगही परतला माघारी

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT