kalvit 1234.jpg
kalvit 1234.jpg 
नाशिक

गंभीर! काळविटाची गोळ्या घालून शिकार; संशयितांकडे पोलीसांना सापडल्या धक्कादायक गोष्टी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येवला, नांदगाव तालुक्यातील राखीव वनांमध्ये काळवीट या वन्यजीवांचा वावर आढळून येतो. काळवीटचे संवर्धन नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागातील वनांमध्ये होत असताना मालेगाव, नांदगाव, देवळा तालुक्यातील काही शिकारी रात्रीच्या वेळी दुचाकी, चारचाकीने काळविटांची शिकार करण्यासाठी भटकंती करतात. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दोन इसम एका दुचाकीवर संशयास्पदरित्या वावरताना आढळले

जिल्ह्यातील दरम्यान, शनिवारी (दि.11) मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास जामदरी ते पांजण रस्त्यावर नांदगाव वनपरिक्षेत्राच्या गस्तीपथकाला दोन इसम एका दुचाकीवर संशयास्पदरित्या वावरताना आढळून आले. पथकाने ना थांबवण्याचा प्रयत्न केला असता यांनी दुचाकी वरून सुसाट धूम ठोकली. यावेळी वन विभागाच्या पथकाने सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करून रात्रीच्या अंधारात दोघांनाही ताब्यात घेतले. 

नायलॉनच्या पिशव्यांत पोलीसांना सापडल्या धक्कादायक गोष्टी

हिरो होंडा दुचाकीला (एमएच41 झेड 6847) एक सर्च लाईट लावलेला असल्याचे लक्षात येताच पथकाचा संशय  अधिक बळावला.दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्याजवळ असलेल्या नायलॉनच्या पिशव्यांची झडती घेतली असता, त्यामधून एका नर काळविटाचे धारधार हत्याराच्या सहाय्याने तोडलेले मुंडके व पाय तसेच दुसऱ्या पिशवीत मांसाचे तुकडे मिळून आले. तसेच धारधार सुरे, तीन कटर, ५ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, एक बंदूक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वन्यजीव शिकारीचा गुन्हा

भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अधिसूची-1 मध्ये संरक्षित असणाऱ्या काळवीट वन्यजीवाची नांदगाव वनपरिक्षेत्रात बंदुकीने गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संशयित मुदस्सीर अकिल अहेमद (रा.चुनाभट्टी, मालेगाव), जाहिदअख्तर शाहिद अहेमद (रा.अहेमदपुरा, मालेगाव) अशी अटक केलेल्या दोघा शिकाऱ्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध वन विभागाने वन्यजीव शिकारीचा गुन्हा नोंदविण्यात आला. शिकाऱ्यांना पाच दिवसांची वनकोठडीदोघांना नांदगाव न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नर काळवीट भारतीय वन्यजीव संरक्षण (1972) अधिनियमांतर्गत सर्वोच्च संरक्षण प्राप्त असलेल्या अनुसूची-भाग1चा  वन्यप्राणी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT