husband brutally killed his wife out of anger that she was having an relationship nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्नीचा खून करून रचला अपघाताचा बनाव...

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने तिच्या डोक्यात मुसळीने प्रहार करत निर्घृण हत्या केली. मात्र, पकडले जाऊ नये, यासाठी पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचे भासविले.

मात्र, आडगाव पोलिसांनी पतीसह त्याच्या भाच्यावर खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (husband brutally killed his wife out of anger that she was having an relationship nashik crime news)

मच्छिंद्र भगवान चौरे (वय ४०) व सुरेश तुळशीराम कराड (वय १९, दोघे मूळ रा. नागझरी, ता. केज, जि. बीड, ह. मु. संतकृपा अपार्टमेंट, महाराष्ट्र बँकेसमोर, जत्रा हॉटेलजवळ, आडगाव शिवार), अशी संशयितांची नावे आहेत. यात सुरेश हा मच्छिंद्र यांचा भाचा आहे. तर नंदा मच्छिंद्र चौरे (वय ३५), असे खून केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

मच्छिंद्र हा टेलरिंगचा व्यवसाय करतो. पत्नी नंदा हिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला कळाली होती. त्यातून दोघांत गेल्या काही महिन्यांपासून वाद होत असत. त्याचाच राग मनात धरून २८ जूनला मच्छिंद्र याने सकाळी दहाला मुलगी अंकिता आशेवाडी येथे ट्रेकिंगला गेल्याची व पत्नी नंदा ही एकटीच घरी असल्याची संधी साधत तिच्याशी वाद घातला.

यानंतर खलबत्त्यातील मुसळ तिच्या डोक्यात टाकून खून केला. त्यानंतर धास्तावलेल्या मच्छिंद्रने भाचास फोन करून बोलावून घेत मामीचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर ‘आपण हा अपघात दाखवू, तू तुझ्या नंदा मामीची स्कूटी घेऊन जा, स्कूटीची तोडफोड करून गाडी एम. के. बिअर शॉपीच्या समोरच्या रस्त्यावरील दिशादर्शक बोर्डाच्या पोलजवळ लावून ये, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मामाने सांगितल्यानुसार सुरेशने गाडीची तोडफोड करून अपघात झाल्याचे दर्शवत खुनाचा पुरावा नष्ट केला. नंदा चौरे २८ जूनला सकाळी अकरा वाजता स्कूटीने घरी जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीस आडगाव येथील महाराष्ट्र बँकेसमोरील एम. के. बिअर शॉपजवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने मागून ठोस दिल्याने त्या खाली पडून जखमी झाल्याचे भासवीत डॉक्टरांना अपघात झाल्याचे खोटे सांगून मच्छिंद्र व सुरेशने खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर नंदा यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मच्छिंद्र यांच्याकडे दिला. त्यांनी नातलगांच्या उपस्थितीत आडगाव येथे अंत्यसंस्कार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT