File Photo
File Photo esakal
नाशिक

Nashik News : इगतपुरी नगर परिषदेत अग्निशमन दलाची पदे रिक्त! 10 वर्षांपासून भरती नाही

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावर काही दिवसांपासून वाहनांना आग लागण्याचे प्रमाण वाढले असून, आग विझविण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था व अग्निशमन दलाची भूमिका महत्वपूर्ण असते.

मात्र इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची रिक्त पदे दहा वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे तसेच सध्या जे कामगार आहे, त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण मिळत नसल्याने मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Igatpuri City Council fire brigade posts vacant No recruitment for 10 years Nashik News)

या बाबीकडे आत्तापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्षच दिले नाही. दहा वर्षात नगर परिषदेच्या दोन पंचवार्षिक निवडणुका झाल्या. मात्र एकाही नगरसेवकाने या विषयी ठरावसद्धा केला नाही.

विशेष म्हणजे या अग्निशमन दलाचा विशेष कक्ष असून यात नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी, शिपाई हे अदांज कारभारावर अग्निशमन दलात काम करत आहे. एखादी मोठी घटना घडल्यास यास कोण जबाबदार, असा प्रश्न नागरिकांनी व्यक्त केला आहे.

नगर परिषेकडे अग्निशामन दलासाठी यंत्रणा ही कमी प्रमाणात असून अनेक वर्षांपासून पदे रिक्त आहे आग विझवण्यासाठी दोन बंब आहे. एक वाहन फोममारा करण्यासाठी तर दुसरे पाण्याचा मारा करण्यासाठी आहे. मात्र या दोन्ही गाड्यांवर एकच चालक असल्याने मोठी अडचण होते.

कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात नसल्याने कुचंबना होते. अग्निशमन दलाच्या दोन्ही गाड्या दुरुस्त असून, आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोग होत आहे. अग्निशमन दलात एक चालक व चारच कर्मचारी आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार ३१ हजार लोकसंख्या असून, जवळपास शहरांमध्ये साडेपाच हजार घरे आहेत. या घरांवर आपत्कालीन परिस्थितीत दोन अग्निशमन दलाच्या गाड्या नियंत्रण ठेवतात.

गेल्या वर्षी शहरांमध्ये छोट्या-मोठ्या अनेक घटना घडल्या. त्यावर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले. मात्र या ठिकाणी यंत्रणेला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. शहरात बजरंगवाडा व पवारनगर येथे अरुंद रस्ता व दाट लोकवस्ती असल्याने येथे अग्निशमन दलाचे बंब पोहचू शकत नाही. या वेळी घटनास्थळी होज पाइपचाद्वारे पोहोचावे लागते.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

नुकत्याच जिंदल कंपनीला भीषण स्फोटामध्ये इगतपुरी नगर परिषदच्या अग्निशमन दलाचे दोन्ही बंब तीन दिवस आपत्कालीन ठिकाणी होते तसेच वर्षभरामध्ये नगर परिषद हद्दीतील ६५ वेळा तर नगर परिषद हद्दीबाहेर १३ वेळा या अग्निशमन बंब गाड्यांचा उपयोग झाला आहे.

"सध्या आमच्याकडे अग्निशमन दलात चार माणसे आहे. फायरमन हे पद अद्यापही रिक्त आहे. मात्र शासनाकडून अजूनही काही रिक्त पदे अद्यापही भरलेली नाहीत. प्रस्ताव पाठवला आहे."

- पंकज गोसावी, मुख्याधिकारी

"कर्मचारी आहेत. मात्र यांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच वाहनचालक एकच असल्याने दुसऱ्या वाहनावर चालक भरती होणे गरजेचे आहे. शासनाने आधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे."- मोहन पवार, अतिरिक्त प्रभारी अग्निशमन विभागप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Supriya Sule : आईवर बोलला तर करारा जबाब देईन - सुप्रिया सुळे

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT