Indian-Rupee-counting.jpg 
नाशिक

इगतपुरी-त्र्यंबकला मुद्रांक शुल्कापोटी शासनाला साडेसात कोटींचा महसूल

गोपाळ शिंदे

नाशिक : (घोटी) मुंबई, ठाण्यातील झगमगाट सोडून पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी आलेले नागरिक इगतपुरी परिसरात जमिनी खरेदी करत असून, लॉकडाउनमध्ये जमीन खरेदीचे उच्चांक मोडीत काढले आहेत. मे ते सप्टेंबरदरम्यान मुद्रांक शुल्कापोटी शासनाला पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला आहे. 

लॉकडाउन काळात जमीन खरेदी-विक्री जोरात 

इगतपुरी परिसरात आदिवासी भागाची सफर करताना निसर्गाच्या सानिध्यात एखादे फार्महाउस अथवा घर असावे, या इच्छेतून वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे मंडळी जमिनी खरेदीसाठी पुढे येत आहेत. लॉकडाउन काळात हातातील पैसे खर्च झाले, नोकऱ्या गेलेल्या असतानाही इगतपुरी तालुक्यातील जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई-ठाणे-नाशिक परिसरातील ग्राहकांची मिळकती खरेदीसाठी इगतपुरी तालुक्यास पसंती असल्याचे दिसून येत आहे. 

एक हजारांवर दस्त नोंदणी 

एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान एक हजार २०१ दस्त खरेदी-विक्री नोंद करण्यात आली. मेमध्ये ८५, जून- १९२, जुलै- २७३, ऑगस्ट- २९७, सप्टेंबर- ३५४ जागा खरेदी करण्यात आल्या. मुद्रांक शुल्कापोटी पाच कोटी ३३ लाख ५७ हजार ४५० रुपये महसूल मिळाला. यातून जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषदेस मिळणाऱ्या टक्केवारीत वाढ झाली असली, तरी हा निधी खर्च कशा प्रकारे होतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. 

त्र्यंबक निबंधक कार्यालयात गर्दी 

त्र्यंबकेश्वर : मार्चपासून लॉकडाउनमुळे येथील अर्थकारण ठप्प असले, तरी सहाय्यक निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी उत्साह आहे. आर्थिक अडचणींमुळे तालुक्यातील मालमत्ता खरेदी-विक्री जोरात असून, छत्रपती शिवाजी चौकातील शिवनेरी इमारतीत नोंदणीसाठी वर्दळ असते. ४४८ दस्त नोंदणी झाली असून, मुद्रांक शुल्कापोटी शासनाला दोन कोटी २१ लाख ६५ हजार रुपयांचा महसूल मिळाला. आर्थिक अडचणींमुळे मालमत्ता विक्रीची गती वाढल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.  

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Politics : ये मेरा शहर…’ पालिका निकालांनी सांगलीत उभे केले नवे धुरंधर, जुन्या समीकरणांना धक्का

Horoscope 2026 : मंगळ गोचरमुळे बनतोय रूचक राजयोग; मकर संक्रांती नंतर चमकणार 'या' 5 राशींचे भाग्य, मिळणार यश अन् भरपूर पैसा

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

Doodh Soda: ‘धुरंधर’मुळे व्हायरल झालेलं पाकिस्तानमधील पेय नेमकं काय? जाणून घ्या दूध सोडा कसा बनवायचा

'माझं शरीर निकामी व्हायची वेळ आली होती' अमृता सुभाषने कसा केला डिप्रेशनचा सामना, अभिनेत्री म्हणाली...

SCROLL FOR NEXT