BJP news esakal
नाशिक

BJP Women State Executive: भाजप महिला प्रदेश कार्यकारिणीत नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

BJP Women State Executive : भाजपच्या महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा बुधवारी (ता.३१) करण्यात आली. महिला प्रदेश कार्यकारिणीत नाशिकच्या तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

अॅड. अलका जांभेकर, स्वाती भामरे, जयश्री अहिरराव यांची उपाध्यक्षपदी, तर सरचिटणीसपदी छाया देवांग यांची नियुक्ती करण्यात आली. (Inclusion of office bearers of Nashik in BJP Women State Executive news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नवीन कार्यकारिणीमध्ये १२ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, १४ चिटणीसांचा समावेश केल्याची माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता देशमुख, मंगल वाघ, आम्रपाली साळवे, रितू तावडे, शौमिका महाडीक, कांचन कूल, अॅड. अलका जांभेकर, स्वाती भामरे, जयश्री अहिरराव यांची नियुक्ती केली आहे.

सरचिटणीसपदी मंजूषा कुद्रीमोती, छाया देवांग, स्वाती शिंदे, मीना मिसाळ, रेखा हाके, अलका अत्राम, रश्मी जाधव, रचना गहाणे यांची नियुक्ती केली आहे. चिटणीसपदी नयना वसानी, अपर्णा पाटील, रूपाली कचरे, सुनिशा शहा, अर्चना वडनाल, क्षमा चौकसे, शुभदा नायक, गिता गिल्डा, रेखा वर्मा, अॅड. वीणा सोनवलकर, रेखा डोळस, रेश्मा शेख, माधुरी पालवे, तृप्ती मामले यांची नियुक्ती झाली आहे.

तर कोषाध्यक्षपदी भारती चौधरी यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्च्याच्या नवीन पदाधिकारी संघटनात्मक कार्य चांगल्या प्रकारे करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. तसेच उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT