Traffic Rules esakal
नाशिक

वाहतूक नियम मोडला तर भरावा लागेल 25 पट अधिक दंड; नवीन नियमावली जाहीर

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : वाहतूक पोलिसांनाही (Traffic police) न जुमानता आदेश धाब्यावर बसून सुसाट वाहने चालवणारे अनेक महाभाग दिसतात..अशांना आता नियम मोडल्यास जबरदस्त दंड भरावा लागणार आहे. मोटार वाहन अधिनियम (Motor Vehicle Act) 2019 नुसार नवीन दंडाची रक्कम दुपटीहून वाढली असून वाहनधारकांना आता शिस्तीचे व नियमांचे (Traffic Rules) पालन करावेच लागणार आहे. अन्यथा 200 रुपयाच्या ठिकाणी पाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची वेळ येऊ शकते.

राज्यभरात आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढ

अतिवेगात वाहने चालवून स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालणारे अनेक महाभाग रस्त्यावर वाहने चालवताना दिसतात. अतिवेगात वाहन चालवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना यापूर्वी जुजबी दंड भरावा लागत होता. दंडाची किरकोळ रक्कम भरून वाहतूक पोलिसांपासून सुटका होत होती. मात्र आता या दंडाच्या रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. मोठ्या रकमेच्या दंडामुळे तरी वाहनांचा वेग व इतर कारणांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसणार आहे. सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली आहे.
वाहतुकीच्या संदर्भातील विविध गुन्ह्यांसाठी राज्यभरात आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढ केली आहे.

अशी असेल नवीन दंडाची रक्कम

वाहतूक नियमात संदर्भातील दुरुस्ती कायदा 1 डिसेंबर 2021 पासून लागू करण्यात आला असून वाहतूक विभागाने या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यासोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही नियंत्रण येणार आहे. केंद्राच्या नवीन कायद्यानुसार वाहन चालवताना मोबाईलवर (Mobile) बोलत असल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड, तर चारचाकी वाहनचालकांना 2 हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. अशा प्रकारचा गुन्हा तीन वर्षांच्या आत दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरही गुन्हा घडल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये इतका दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

विना लायसन फिरताय, भरा 5 हजार....

नवीन नियमानुसार विनापरवाना (without license) वाहन चालविणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बेदरकारपणे आणि धोकादायकरित्या वाहन चालवल्यास दुचाकीस्वाराला एक हजार रुपये तर चार चाकी चालकाला तीन हजार रुपये व याव्यतिरिक्त अन्य वाहनांच्या चालकाला 4 हजार रुपये दंड आकारण्याची मुभा या कायद्यानुसार वाहतूक विभागाला देण्यात आली आहे. मोबाईलवर बोलताना वाहन चालवल्यासही तब्बल 10 हजारांपर्यत दंड होणार आहे.

बाबा, नाना, मामा, दादांना आता नोे एक्सक्यूज...

वाहनांना परावर्तक (Reflector) नसणे, फॅन्सी नंबर प्लेट (Fancy number plate) बसवणे या वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना यापूर्वी फक्त दोनशे रुपये दंड आकारण्यात येत होता, आता दंडाच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आली आहे. बाबा, नाना, मामादादा अशा अतिप्रेमाच्या नंबरप्लेटसाठी पंधराशे रुपयांपर्यंत दंड होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT