नाशिक : इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू झाल्यापासून जिल्ह्यात तब्बल एक लाख ७० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी गत पाच महिन्यांत ३५ हजार नागरिकांनी खाते उघडले असून, यात सर्वाधिक प्रमाण हे ग्रामीण भागातील आहे.
भारतीय टपाल पेमेंट बँका नागरिकांसाठी ठरताहेत वरदान
कोरोना काळातील गेल्या पाच महिन्यांत आधार संलग्न भुगतान सेवामार्फत दीड लाख ग्राहकांनी २० कोटी रुपये काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना यांचा सर्वाधिक लाभ ग्राहकांनी घेतल्याची माहिती जिल्ह्याचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. या वेळी खातेधारकांना बँकेच्या या सेवेचा फार उपयोग झाला. पैसे पोचविणारा पोस्टमन पैसे पोचविण्यासोबतच नागरिकांच्या फोनला रिचार्ज करून देणे, त्यांचे ऑनलाइन वीजबिल भरून देणे आदी महत्त्वाच्या बाबींमध्ये मदत करत आहेत.
आदिवासींच्या खावटी योजनेसाठी प्रयत्नशील
आदिवासी विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात येणाऱ्या खावटी योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक संलग्न संस्था म्हणून काम करणार आहे. त्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रायोगिक तत्त्वावर नाशिक जिल्ह्यातील कातकरी या आदिवासी समाजाच्या सर्वच नागरिकांचे खाते उघडण्यात आले असून, हा प्रयोग लवकरच राज्यभर अवलंबिला जाणार आहे. याशिवाय महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांनादेखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये लवकरात लवकर समाविष्ट करून त्यांनादेखील या सुलभ सेवेचा लाभ देण्याचा मनोदय श्री. अहिरराव यांनी व्यक्त केला.
टपाल बँकेतर्फे मिळणार शिष्यवृत्ती
डाक विभागातर्फे लवकरच इयत्ता दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३७ हजार शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची यादी शासनस्तरावरून प्राप्त झाली असून, लवकरच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्यांसोबत चर्चा करून ही प्रणाली डाक विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असून, त्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे त्यांना ताबडतोब मिळणार आहेत.
हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.