Collector Jalaj Sharma speaking at the Election Literacy Board meeting. Neighbor Dr. Shashikant Mangarule, Jitin Rahman esakal
नाशिक

Nashik News: मतदार जनजागृतीत नवयुवकांना सहभागी करा; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीच्या प्रक्रियेत नवयुवकांना सहभागी करून घेतल्यास सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात निश्चितच सकारात्मक परिणाम दिसेल, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात निवडणूक साक्षरता मंडळ कार्यपद्धती कार्यशाळेत ते बोलत होते. ( Instructions by District Collector to Involve Youth in Voter Awareness nashik news)

सहाय्यक जिल्हाधिकारी जितीन रहेमान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, स्वाती थविल, तहसीलदार मंजूषा घाटगे, वर्शिप अर्थ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी, निवडणूक साक्षरता मंडळाचे राज्य मुख्य समन्वयक अल्ताफ पीरजादे, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, जिल्हा समन्वयक अविनाश शिरसाट, स्पेक्ट्रम ॲकॅडमीचे संचालक सुनील पाटील, नाशिक स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की नवमतदार नोंदणी, मतदार यादीतील त्रूटी दूर करणे, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळणे यांसाठी निवडणूक मतदार अधिकारी यांच्यामार्फत मोहीम स्तरावर काम सुरू आहे. नवयुवकांच्या संख्येच्या तुलनेत जिल्ह्यातील नवयुवकांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे.

महाविद्यालयीन स्तरावर सामंजस्य कराराच्या माध्यमातून सहभागी करण्यात येणार आहे. ॲड. नितीन ठाकरे, स्पेक्ट्रम ॲकॅडमीचे संचालक पाटील, नाशिक स्कूल असोसिएशनचे जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार मंजूषा घाटगे यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्र

पात्र विद्यार्थी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया जवळून अनुभवयास मिळणार आहे. सहा महिन्यांत हे काम सर्वांनी मिळून पार पाडावे, असे आवाहन डॉ. मंगरूळे यांनी केले.

‘वर्शिप अर्थ’चे तेजस गुजराथी यांनी, युवाशक्तीचा सहभाग निवडणूक प्रक्रियेत वाढविणे हाच या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असून, कार्यशाळेत सहभागी ५१ महाविद्यालयांना उत्कृष्ट जनजागृतीबद्दल ५० हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून, या इंटर्नशीपच्या प्रमाणपत्राचा भविष्यात परदेशात शिक्षणासाठी उपयोग होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT