नाशिक

International Tiger Day 2023 : नाशिकच्या ‘फार्मासिस्ट’चे ‘व्याघ्र कॉफीटेबल बुक’; 40 वाघांचा अभ्यास

आनंद बोरा

International Tiger Day 2023 : येथील ‘फार्मासिस्ट’ अनंत सरोदे हे वाघांविषयी जनजागृती व्हावी म्हणून प्रयत्न करताहेत. पक्षीमित्र असलेल्या सरोदेंना नांदूरमध्यमेश्‍वरपासून निसर्गाचे वेड ताडोबापर्यंत घेऊन गेले. २०१० पासून त्यांनी वाघांचा अभ्यास सुरू केला.

‘ताडोबा’मध्ये त्यांनी आतापर्यंत पाहिलेल्या ४० वाघांचा अभ्यास केला आहे. पेंच, गिर, दांडेली, रणथंबोर, लिटील रान ऑफ कच्छ, जिम कॉर्बेट, राजाजी अशा अभयारण्यांचा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी टिपलेल्या वाघांच्या छायाचित्रांचे ‘व्याघ्र कॉफीटेबल बुक’ तयार झाले आहे. (International Tiger Day Pharmacist Anant Sarode is trying to create awareness about tigers nashik news)

रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये २९ जुलै २०१० ला झालेल्या व्याघ्र परिषदेत २९ जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानिमित्त सरोदेंच्या या छंदाविषयीची ही माहिती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले.

निफाडचे माजी आमदार अनिल कदम, ज्येष्ठ नेते सुनील बागूल आदी उपस्थित होते. सरोदेंनी वाघांसह वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे आदींच्या टपाल तिकिटांचा संग्रह केला असून, त्यांच्या संग्रहात २५० पेक्षा अधिक तिकिटे आहेत.

सरोदे ज्यावेळी जंगलात जातात, त्यावेळी कोणता वाघ कुठे दिसला, त्याचे नाव, त्याच्या बछड्यांची नावे; तर ‘ताडोबा’मध्ये कोणता वाघ कुठे गेला यासंबंधीचे टिपण त्यांच्या वहीत आहे.

‘ताडोबा’च्या मोहर्ली-पदमापूर रस्त्यावर गाडीने जाताना रस्त्यात एक वाघ आला. सर्व वाहने थांबली. पण, एक दुचाकीधारक वाघाजवळ गेला. वाघाने त्याच्यावर हल्ला केला; पण तो वाचला. हा प्रसंग पाहून सरोदेंनी जनजागृती करण्याचे ठरविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये घरी असताना त्यांनी घरातून पक्षी निरीक्षण करीत घराजवळ २९ प्रकारचे पक्षी पाहिले.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ते पक्षी गणनात सहभागी होतात. लहानपणी वडिलांनी दिलेल्या ऑस्ट्रेलियन वाईल्ड लाईफच्या २५ पुस्तकांचा संच वाचून मला निसर्गाची आवड निर्माण झाल्याचे सांगत आफ्रिकन सफारी या चित्रपटामुळे वन्यप्राण्यांची जवळीक झाल्याचे सरोदे सांगतात.

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वांत मोठा प्राणी आहे. देशात ३९ व्याघ्र प्रकल्प आहेत. वाघांचा अधिवास घनदाट जंगलात असल्याने त्या ठिकाणच्या जमिनीची धूप होत नाही. परिणामी, पाण्याचे स्रोत कायम राहतात.

या स्रोतामुळे ३९ व्याघ्र प्रकल्पातून छोट्या-मोठ्या ३५० पेक्षा अधिक नद्यांचा उगम होतो. भूगर्भातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास मदत होते. त्यातून जैवविविधतेचे संवर्धन होते. यावरून आपल्याला व्याघ्र प्रकल्पाचे महत्त्व लक्षात येईल, असे सरोदे सांगतात.

"फार्मासिस्ट’चे काम करताना वाघांचे संवर्धन होण्यासाठी मी खारीचा वाटा उचलला आहे. गेल्या १५ वर्षांत मी ‘ताडोबा’मध्ये ४० वाघ पाहत त्यांची टिपणे घेतली आहेत. कोणता वाघ, कोणत्या परिसरात राहतो, तो त्याचे ठिकाण केव्हा सोडतो याची माहिती अभ्यासातून मिळाली.

भविष्यात मला नाशिकमध्ये वाघांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याची इच्छा आहे. तसेच, शाळा-महाविद्यालयांतून वाघ आणि बिबट्याबद्दल जनजागृती करणार आहे." - अनंत सरोदे, फार्मासिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT