नाशिक

Jagdish Patil Bribe Case : लाचखोर पाटीलकडे 45 लाखांची मालमत्ता; एक दिवसाची कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Jagdish Patil Bribe Case : जाहिरात बनविण्यासाठी आलेल्या वाहनांवर जीएसटी न लावता सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या जगदीश पाटील याच्याकडे ४५ लाखांची मालमत्ता आढळून आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ४) रात्री पाथर्डी फाटा येथील विक्रीकर भवन येथे पाटील यास रंगेहाथ अटक केली. त्यास न्यायालयाने बुधवार (ता. ६)पर्यंत एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. (jagdish Patil has property worth 45 lakhs nashik bribe crime news)

जगदीश सुधाकर पाटील, असे संशयित जीएसटी अधिकाऱ्याचे नाव आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ५) गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता, त्यास बुधवार (ता. ६)पर्यंत एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हा मुंबईतील जाहिरात व्यावसायिक आहे. टाटा कंपनीने नुकतेच एक नवीन वाहन बाजारात आणले असून, त्याची जाहिरात करण्यासाठी तो नाशिकमध्ये आला होता.

त्याचवेळी जाहिरात करण्यासंदर्भातील आवश्यक परवाने व शासकीय शुल्क भरण्यासाठी तक्रारदार राज्य कर विभागात गेला असता, पाटील यांनी या तक्रारदार व्यावसायिकास ‘तुमचे पाच ते सहा लाखांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, ते होऊ देत नाही’, असे म्हणून चित्रीकरणासाठी आलेली नवीन वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या मोबदल्यात पाटील यांनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, सोमवारी (ता. ४) रात्री कारवाई करण्यात आली.

लाचलुचपत पथकाकडून घरझडती

लाचखोर पाटील याच्या घराची झडती लाचलुचपतच्या पथकाने घेतली असता, एकूण ४५ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता हाती लागली आहे. अद्यापही झडती व बँक खाते तपासले जात असून, आढळलेल्या कागदपत्रांद्वारे इतर मालमत्तांचा शोध घेतला जात आहे. मालमत्ता कुठे व किती आहे, जमीन, दागिने, प्लॉट, वाहने इतरही बाबींचा शोध पथकाकडून घेतला जात असल्याची माहिती ‘लाचलुचपत’चे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT