jayant Patil
jayant Patil esakal
नाशिक

Jayant Patil | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मविआला राष्ट्रवादीची प्राथमिकता : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची प्राथमिकता महाविकास आघाडीला आहे. महाविकास आघाडी कायम राहावी, ही पक्षाची आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांची इच्छा आहे.

त्यासंबंधाने आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. शक्यतो सर्व ठिकाणी महाविकास आघाडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी (ता. २९) येथे सांगितले. (Jayant Patil statement NCP priority for local body elections to mahavikas aghadi nashik political news)

राष्ट्रवादीच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अनुषंगाने श्री. पाटील म्हणाले, की असे सर्व लोक भाजपने गोळा केले आहेत. भाजपची प्रतिमा त्यातून मलिन होतेय. भाजपने आपला स्तर कुठे नेऊन ठेवला, हे महाराष्ट्र बघतोय. त्यावर रोज उठून उत्तर देण्याची आवश्‍यकता नाही.

राष्ट्रवादीतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता असलेल्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांसमवेत संघटनात्मक चर्चा करतोय, असे सांगून श्री. पाटील यांनी मराठवाड्यातील महाविकास आघाडीची मोठी सभा होईल, असा विश्‍वास व्यक्त केला.

तसेच अगोदरच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता, ही सभा मोठी होईल. राज्यातील सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. मात्र महाविकास आघाडीच्या सभांना पक्षाध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहण्याविषयी आमची पूर्ण चर्चा झालेली नाही.

येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे सांगून श्री. पाटील विरोधकांच्या वक्तव्याविषयी म्हणाले, की महाराष्ट्रासमोर अनेक महत्त्वाचे विषय आहेत. गर्दी कुणी, कुठं जमवली? याला फार महत्त्व राहिलेले नाही. जनतेपुढे महागाई, बेकारी असे अनेक प्रश्‍न आहेत. नको त्या प्रश्‍नावर चर्चा करणे आणि त्यावर भाष्य करणे योग्य नाही.

सरकार नसेल तर पर्याय नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात ‘डिस्कॉलिफिकेशन’ झाल्यास राज्यातील सरकारला राहाता येणार नाही. सरकार राहिले नाही, तर राष्ट्रपती राजवटखेरीज दुसरा पर्याय राहील असे मला वाटत नाही. त्यासंबंधाने मी बोललो आहे.

तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचे वाक्य महाराष्ट्रातील काही लोक स्वतःला लावून घेत असल्यास त्याला आम्ही काय करणार? त्यांनी काही केले नसल्यास वाक्य त्यांच्यासाठी नाही असे समजावे. पण त्यांना ते वाक्य एवढे झोंबत असेल, तर त्यांना न्यायालयात जाऊन तिघांना न्यायालयात बोलवावे लागत असेल.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

जयंत पाटील म्हणालेत...

- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्याविषयी ठाकरे गट आणि काँग्रेस काय करायचे ते दोघे ठरवतील. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही. पक्षाध्यक्ष शरद पवारांनी यासंबंधी बैठक घेतली. त्याबाबत अधिकची माहिती नाही.

- राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेशकर्त्या झालेल्या अमृता पवार यांच्याविषयीच्या प्रश्‍नावर नामोल्लेख न करत पक्ष सोडणारेही असतात आणि येणारे असतात, त्यांना फार महत्त्व राहात नाही.

- राज्याच्या मंत्रिमंडळाचा सावळागोंधळ चाललाय. मंत्री विधानसभेच्या सभागृहात नसतात. ते लोकांना काय भेटणार.

- धोरणात्मक व तत्त्वाला विरोध इथपर्यंत मर्यादा ठीक. मात्र व्यक्तीगत पातळीवर टीका, लज्जा उत्पन्न होईल अशी टीका घृणास्पद आहे.

- अलीकडे राजकारणात चटकन पुढे जाणारा एक वर्ग प्रत्येक पक्षात असतो. तो असा आक्रस्ताळेपणा करत असतो. माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे. त्यांचा गैरसमज असतो, की त्या पक्षाची लोक त्यांना महत्त्व देतात.

- कोरोनाच्या प्रश्‍नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे. काही प्रमुखांना कोरोना झाला. लागण वाढायला लागलीय. सरकारने तातडीने उपाययोजना करावी.

- जनता हीच राम समजून जनतेची सेवा करावी. अयोध्येला, गुवाहाटीला सर्व मंत्रिमंडळ जाणे हे प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला न रुजणारे आहेत.

- आमची देखील रामावर भक्ती आहे. आम्ही देखील रामभक्त आहोत. परंतु स्वतःला एकट्याला जाऊन काय पूजा करायची असेल ती करावी.

- कुणाचा बळी द्यायचा असेल तर द्यावा, तिथे बळी द्यायची प्रथा आहे, असे मी ऐकलं आहे. मात्र सर्व मंत्रिमंडळ तिथे घेऊन जायचं आणि महाराष्ट्राचा वेळ खर्च करायचा. मात्र ठीक आहे, सत्तेपुढे शहाणपण फार चालत नाही, हे लक्षात ठेवायचे!

- अमृता फडणवीस यांना कशा प्रकारची धमकी आली, हे मला माहिती नाही. मात्र धमकी आली असल्यास त्याची काळजी घेतली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT