shekhar borse.jpg 
नाशिक

कोरोनाला चार हात लांब ठेवण्यासाठी शेखरची भन्नाट कल्पना..! एकदा वाचाच..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येकालाच कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याची धास्ती वाटत आहे. त्यातूनच विविध प्रकारे सावधगिरी बाळगली जात आहे. परंतु, तंत्रज्ञानाचा उपयोग करत कोरोनाला चार हात लांब ठेवण्याच्या भन्नाट कल्पना नाशिकमधील युवा संशोधक शेखर बोरसे याने लढविल्या आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ही तर भन्नाट कल्पना..

रास्पी इव्हेंट्स या स्टार्टअपच्या माध्यमातून शेखर यांनी यापूर्वीही अनेक आविष्कार स्वरूपातील उत्पादनांची निर्मित्ती केली आहे. कोरोना महामारीमुळे उद्‌भवलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी मार्चमध्येच विचारमंथन सुरू केले. यातून नागरिकांच्या सोयीसाठी विविध उत्पादने विकसित केलीत. त्यात, रास्पी व्हिजिट ही अत्यंत प्रभावी यंत्रणा असून, एखाद्या कंपनी, रुग्णालय किंवा मोठ्या सोसायटीत येणाऱ्या व्हिजिटरच्या सर्व नोंदी ठेवण्यासह भेटीचे कुशल व्यवस्थापन या माध्यमातून केले जाते. त्यानुसार कंपनी किंवा संबंधित अस्थापनेचे संकेतस्थळ, ॲपद्वारे इच्छुकाने भेट देण्याकरिता मागणी नोंदविल्यास संबंधित अधिकारी, व्यक्‍तीस त्याची माहिती कळविली जाते. यानंतर संबंधितांकडून भेटीची वेळ कळविताना ओटीपी, क्‍यूआर कोड उपलब्ध केला जातो. तसेच, भेट देणाऱ्याचा आरोग्यविषयक सविस्तर तपशीलदेखील नोंदविला जातो. याद्वारे संबंधिताच्या नोंदी ठेवण्यासह भेटीची प्रक्रियादेखील सुरक्षितरीत्या पार पाडता येते. ही यंत्रणा विकसित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलीजन्स व मशिन लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. 

कंपनी, रुग्णालयांसह गृह प्रकल्पांत भेटीचे स्मार्ट व्यवस्थापन करण्यासाठी 'रास्पी व्हिजिट' ही यंत्रणा विकसित केली आहे. वापरलेल्या मास्कची विल्लेवाट लावण्यासाठी वेंडिंग मशिन विकसित केली आहे. तसेच, कुठल्याही स्पर्शाशिवाय सॅनिटायझर प्राप्त करण्यासाठी ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेसर मशिनदेखील विकसित केले आहे. 


मास्क वेंडिंग अन्‌ डिस्पोझल मशिन 
सध्याची परिस्थिती लक्षात घेत शेखरने मास्क वेंडिंग मशिन व मास्क डिस्पोझल मशिनदेखील साकारली आहे. मास्क डिस्पोझल मशिनद्वारे वापरलेले मास्क नष्ट करण्याची सुरक्षित प्रक्रिया राबविले जाते. अत्यल्प शुल्क अदा करत ही प्रक्रिया राबविली जात असल्याने वापरलेल्या मास्कपासून विषाणूचा फैलाव होण्याचा धोका टाळला जातो. 

ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर 
कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी सॅनिटायझर अत्यंत उपयुक्‍त ठरते. परंतु, सॅनिटायझरच्या कंटेनरच्या मानवी स्पर्शाने धोका बळावतो. ही बाब टाळण्यासाठी ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेन्सर मशिन साकारली आहे. याद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राच्या आधारे मानवी स्पर्शाशिवाय सॅनिटायझर प्राप्त करणे सुलभ होते. 

रास्पी-व्हिजिट अत्यंत प्रभावी प्रणाली

संकटाच्या काळात तंत्रज्ञानाच्या आधारे समस्येवर उपाय शोधण्याच्या प्रयत्नातून ही उत्पादने विकसित केलेली आहेत. रास्पी-व्हिजिट अत्यंत प्रभावी प्रणाली असून, मास्क वेंडिंग मशिन व मास्क डिस्पोझल मशिनदेखील आजच्या काळाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निंग तंत्राचा वापर या उपकरणांमध्ये केलेला आहे. -शेखर बोरसे, संस्थापक, रास्पी इव्हेंट्‌स...  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगावकरांचा श्वास कोंडला! महामार्गावर धुळीचे लोट, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारांकडे बोट

Nashik Municipal Election : नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'; फोडाफोडीनंतर अनिल देसाईंनी फुंकले रणशिंग!

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची बंगळुरूत धडक कारवाई

Phulambri Housing Scheme : आधार पडताळणी अडकल्याने १११ लाभार्थ्यांचे घरकुल रखडले; निवाऱ्याची चिंता कायम!

Viral: जिथे माणसांपेक्षा मांजरींचं होतं राज्य, तिथं ३० वर्षांनी बाळाचा जन्म, शांत गावात आनंदाची चाहूल

SCROLL FOR NEXT