kharif.jpg 
नाशिक

मृगाच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा!...खरिपाच्या पेरणीला मिळाला वेग..

सकाळवृत्तसेवा

नाशिक : निसर्ग चक्रीवादळावेळी झालेल्या दोन दिवसांच्या पाण्यावर जिल्ह्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील भागात खरिपाच्या पेरण्यांना सुरवात झाली होती. तसेच मृग नक्षत्राच्या पावसावर आतापर्यंत खरिपाच्या 32.76 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 

जूनचे सरासरी पर्जन्यमान 174.40 मिलिमीटर

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दोन लाख 18 हजार 43 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी खरिपाच्या पाच लाख 75 हजार 588 हेक्‍टर क्षेत्रात सहा लाख 65 हजार 582 हेक्‍टरपर्यंत वाढ झाली. ज्यांच्याकडे भांडवल उपलब्ध असताना गटांच्या माध्यमातून बियाण्यांची खरेदी 
केली अशांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या केल्या आहेत. नांदगाव तालुक्‍यात सर्वाधिक 68.73 टक्के सर्वाधिक, तर सर्वांत कमी 0.03 टक्के पेरणी इगतपुरी तालुक्‍यात झाली आहे. जिल्ह्यातील जूनचे सरासरी पर्जन्यमान 174.40 मिलिमीटर असून, आतापर्यंत 171. 63 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आदिवासी भागात भाताच्या लागवडीसाठी रोपे टाकण्यात येत आहेत. 

समाधानकारक पेरण्या 

कळवण, देवळा, नांदगाव, चांदवड, बागलाण, मालेगाव, येवला या तालुक्‍यांत समाधानकारक पेरण्या झाल्या आहेत. पण त्याचवेळी सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, नाशिक या आदिवासी भागांसह निफाड, सिन्नरमध्ये पेरण्या कमी झाल्या आहेत. दरम्यान, पेरणीसाठी भांडवलाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला, तरीही पीककर्जासाठीचे हेलपाटे संपण्याचे नाव घेतले जात नाही. त्यातच बियाण्यांच्या दरवाढीने शेतकरी बेजार झालेत. 

पीकनिहाय खरिपाची पेरणी 
(क्षेत्र हेक्‍टरमध्ये) 
पिकाचे नाव प्रस्तावित क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र 

ज्वारी ----- 554 183 
बाजरी ----- 1 लाख 17 हजार 504 45 हजार 505 
मका ----- 2 लाख 9 हजार 497 1 लाख 19 हजार 785 
तूर ----- 9 हजार 960 1 हजार 135 
मूग ----- 58 हजार 773 6 हजार 895 
उडीद ----- 10 हजार 630 628 
भूईमूग ----- 25 हजार 277 5 हजार 186 
सोयाबीन ----- 51 हजार 459 17 हजार 288 
कापूस ----- 40 हजार 322 20 हजार 293 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

Mahadevi Elephant : कोल्हापूरकरांच्या लढ्याला येणार यश? नांदणी मठाच्या 'महादेवी'साठी उच्चस्तरीय समिती घेणार निर्णय

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; ब्रह्मपुरी तालुक्यातील लाखापूर येथील घटना

SCROLL FOR NEXT