parking car.png 
नाशिक

कारमालकाचे बळजबरीने अपहरण; कार मागितल्यावर दफनविधी करण्याची धमकी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : "कार विसरुन जायची नाहीतर तुझा दफनविधी करुन टाकीन" अशी धमकी देत  कारमालकाचे उपहरण केले. कार परत देण्याचे सांगून कारमालकाला चौघांनी बळजबरीने कारमध्ये बसविले. ही घटना शालिमार व वाडीवर्‍हे गोंदे परिसरात घडली. काय घडले नेमके?

कार मागितल्यावर दफनविधी करण्याची धमकी

 नितीश हिंगमिरे यांची कार (एमएच १५-एफटी२७२१) छोटा पठाण, गणेश महाले यांच्यासह आणखी दोघांनी बळजबरीने घेतली. हिंगमिरे यांनी कार परत देण्याबाबत विचारणा केली असता चौघांनी आधी ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. कार परत देण्याचे सांगून त्यांना शालिमार परिसरात बोलावले. त्यानुसार ते शालिमार येथे आले असता चौघांनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. त्यांना वाडीवर्‍हे गोंदे परिसरात आणले. या ठिकाणी त्यांना चौघांनी मारहाण केली. कार विसरुन जायची नाहीतर तुझा दफनविधी करुन टाकीन अशी धमकी दिली.

दोघांवर गुन्हा दाखल

कारमालकाने कार मागितल्याच्या कारणातून चौघांनी मालकाचे अपहरण करत दफनविधी करण्याची धमकी दिल्याची याप्रकरणी पंचवटी येथील नितीश हिंगमिरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित छोटा पठाण, गणेश महाले यांच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress–BJP Joint Group: काँग्रेस-भाजपचा संयुक्त गट स्थापन... मालेगाव महापालिकेत अनपेक्षित राजकीय घडामोड

चारचौघी नाटकानंतर मुक्ता आणि रोहिणी हट्टंगडी 'या' सिनेमात दिसणार पुन्हा एकत्र !

WPL 2026 : मुंबई इंडियन्सचं नशीब यूपीच्या हाती! हरमनप्रीत कौरची खेळी व्यर्थ, गुजरात जायंट्सने Eliminator मध्ये मारली एन्ट्री

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर झालेली चर्चा, शरद पवार, अजितदादांच्या बैठकीचा VIDEO VIRAL

IND vs NZ 5th T20I : टीम इंडिया पाचव्या सामन्यातही प्रयोग करणार? वर्ल्ड कपपूर्वीच्या शेवटच्या लढतीत Playing XI मध्ये बदल दिसणार

SCROLL FOR NEXT