kirit somaiya
kirit somaiya  Sakal
नाशिक

मुख्यमंत्री भुजबळांचा राजीनामा का घेत नाहीत? किरीट सोमय्यांचा प्रश्न

विनोद बेदरकर

नाशिक : भाजपचे नेते हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून सध्या राज्या महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. किरिट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात जोरदार मोहम उघडली आहे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यानंतर खासदार भवना गवळी (Bhavna Gavli) यांंच्या पाच कंपन्यांवर ईडीने छापे टाकले त्यानंतर आता सोमय्या यांनी त्यांचा मोर्चा राष्ट्रवादीचे नेत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे वळवला आहे.

दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळयांची १२० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. दहा बारा वर्षापासून भुजबळ राहत असलेले सांताक्रूज येथील ९ मजली इमारतीची मालकी कुणाची आहे. यानंतरही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (cm uddhav thackeray) हे भुजबळ यांचा राजीनामा का घेत नाहीत असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या सोमैय्या यांनी भुजबळ यांच्या आर्मस्ट्रांग कंपनीची पाहणी केल्यानंतर भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर आरोप केले. आतापर्यत महाविकास आघाडी सरकारमधील ११ गैरव्यवहरांचे पुरावे दिले असून आता बारावा क्रमांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा सोमैय्या यांनी केला. शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.



सोमय्या म्हणाले की, छगन भुजबळ यांची बेनामी मालमत्ता (समिर भुजबळ, पंकज भुजबळ) यांनी २००९ ते २०१४ च्या दरम्यान भ्रष्टाचाराचा पैसा कोलकता व मुंबईच्या बोगस, शेल कंपन्यांमध्ये वळवला. संबधित बोगस कंपन्यांचे पत्ते नाही. कुठले आर्थिक व्यवहार नाही. अशा शेल कंपन्यांमधून भुजबळ परीवाराने स्वत: च्या कंपन्यांमध्ये चेक घेतले व १०० हून अधिक कोटी रुपयांची रक्कम या परिवाराने रोहिंजन तालुका पनवेल येथील (६६.९० कोटी) - मेसर्स देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. दांडा, सांताक्रूझ येथील ९ ५१ स्क्वे. मी. जमीन (७.७२ कोटी) मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. हबिब मनोर, फातिमा मनोर, दांडा, अंधेरी (१७.२४ कोटी) मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. गिरणा साखर कारखाना, मालेगाव. मेसर्स आर्मस्ट्रॉग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. यात कंपन्यांत जमा केली.



बंद कंपनीचे शेअर्स १० हजाराला

भुजबळ परिवाराच्या आर्मस्ट्रांग कंपनीत काही आर्थिक व्यवहार, व्यवसाय नाही, परंतु या कंपन्यांचे १०० रुपयांचे शेअर हे रुपये १०,००० च्या भावाने कोलकता येथील शेल कंपन्यांनी विकत घेतले. मेसर्स परवेश, मेसर्स देविशा, मेसर्स आर्मस्ट्रॉग या कंपन्यांचे स्टेट्स नसताना १०,००० रुपये त्यांचा शेअर म्हणजेच मनी लॉड्रींग भुजबळ यांनी स्वत: कडून रोख रक्कम या शेल कंपन्यांच्या एजंटना दिले व त्या एजंटनी त्या शेल कंपन्यांमधून चेक भुजबळ परिवाराच्या या ४ कंपन्यांना दिले. या चेकद्वारा झालेला पांढरा पैसा (white money) नी भुजबळ परिवाराने या संपत्ती घेतल्या. सुरेश जजोडिया, सीएस सरडा, संजीव जैन आणि प्रवीण कुमार जैन या एजंटनी शेल कंपन्यांद्वारा भुजबळ परिवाराला ११० कोटी रुपये व्हाईट करून दिले. या मनी लॉड्रींग बद्दल प्रवर्तन निदेशालय (ED) नी २०१५ मध्ये भुजबळ परिवारावर कारवाई केली होती व त्यांची अटक ही झाली होती. आयकर विभागांने सुमारे ११० कोटी रुपयांची छगन भुजबळ (परिवार) यांची बेनामी संपत्ती जप्त केली. असे सगळे होऊनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रीमंडळात ठेवले कसे? असा प्रश्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

RIMC Entrance Exam : राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजमधील प्रवेशाची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Latest Marathi News Live Update : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर शुक्रवारी येणार आदेश

SCROLL FOR NEXT