kirtidhwaj 1.jpg 
नाशिक

VIDEO : सप्तशृंगगडावर भाविकांविनाच फडकणार कीर्तिध्वज..परंपरा खंडित न झाल्याने आनंद!

दिगंबर पाटोळे :सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी : सुमारे पाचशे वर्षांची परंपरा असलेला कीर्तिध्वज मंगळवारी (ता. 7) भाविकांच्या अनुपस्थितीत सप्तशृंगगडाच्या शिखरावर फडकणार आहे. 
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आदिमायेचा चैत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मात्र चैत्रोत्सवातील आदिमायेचे धार्मिक विधी 2 एप्रिलपासून न्यासाचे पुरोहित नियमित करीत आहेत.

आदिमायेच्या शिखरावर डौलात फडकणार कीर्तिध्वज

मंगळवारी चतुर्दशी (चावदस)निमित्त कीर्तिध्वज मिरवणूक निघणार नसली, तरी कीर्तिध्वज नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री बाराला समुद्रसपाटीपासून चार हजार 569 फूट उंचावर असलेल्या आदिमायेच्या शिखरावर डौलात फडकणार आहे. मंगळवारी दुपारी न्यासाच्या कार्यालयात निवडक पुरोहितांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. 

दरेगावचे ध्वजाचे मानकरी गवळी पाटील यांच्याकडे 11 मीटर लांबीचा केसरी ध्वज, दहा फूट लांबीची काठी, 20 ते 25 किलो वजनाचे पूजेचे साहित्य देण्यात आला. नंतर ध्वजाचे मानकरी ध्वजास पहिली पायरी, देवी मंदिर आदी ठिकाणी परंपरेनुसार पूजाविधी करीत रात्री बाराला मंदिराच्या शिखरावर कीर्तिध्वज फडकविणार आहेत. दरम्यान, भाविकांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहाता येणार नसले, तरी कीर्तिध्वजाची परंपरा खंडित न झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 3.83? आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत विवाद! ..तर पगार किती वाढणार?

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT