kisan Railway.jpg 
नाशिक

किसान रेल्वे यापुढे आठवड्यातून दोन वेळा धावणार! वाचा सविस्तर

विनोद बेदरकर

नाशिक : देशातील पहिली किसान रेल्वे नाशिकमधून सुरु झाली. या रेल्वेमुळे शेतीमाल थेट परराज्यात विक्रीची जलद सुविधा सुरु झाल्याने आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून दोनवेळा रेल्वे सुरु सोडण्याला रेल्वेने परवानगी दिली आहे.

३२२ टन वाहातूक 

आगॅस्ट महिन्यापासून सुरु झालेल्या पहिल्या किसान रेल्वेला तीन आठवड्यात शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेत, ही रेल्वे आठवड्यातून दोनदा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. ऑगस्ट महिन्यात तीनदा धावलेल्या किसान रेल्वेने पहिल्या फेरीत ७ ऑगस्टला ७३ टन, १४ ऑगस्ट ९८ तर २१ ऑगस्टला १५१ टन शेतमाल वाहातूक झाली. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून मिळत असल्याने किसान रेल्वे आठवड्यातून दोनवेळा सुरु करण्यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आल्याने यापुढे ही रेल्वे आठवड्यातून मंगळवारी व शुक्रवारी देवळाली रेल्वे स्थानकातून सोडण्यात येणार आहे. 

 कोल्हापूर :- ५ बोगी शेतमाल 
सोलापूर : २ बोगी शेतमाल 
नाशिक : १० बोगी शेतमाला 
एकूण : १७ बोगी कृषिमाल 

शेतमाल विक्रीचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा शेतकऱ्यांना व्हावा, खरेदी – विक्री प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी शेतमाल खरेदी  विक्री प्रक्रिया करणारी नोडेल एजन्सी नाफेडच असावी.जर नाफेड एजन्सी असली तर शेतकऱ्यांना परराज्यातील बाजारभावाची रक्कम थेट शेतकऱ्यांना मिळून आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होण्यास मदत होईल. - हेमंत गोडसे (खासदार नाशिक)

संपादन - विनोद बेदरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Mumbai: विरार ते अलिबाग आता फक्त काही मिनिटांत! महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सरकारी पाठबळ, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील

Pune Protest : 'टीईटी' च्या सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ; २४ नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय!

Hybrid learning in MBA : एमबीए आणि पीजीडीएममधील हायब्रिड शिक्षण मॉडेल्सचा उदय: संधी आणि आव्हाने

SCROLL FOR NEXT