leopard sinner.jpg 
नाशिक

शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

अजित देसाई

नाशिक (सिन्नर) : जनावरांना चारा टाकण्यासाठी ते शेडनेटकडे गेले. शेडनेट फाडून कोणीतरी आत शिरले असल्याचा त्यांना संशय आला. धावतच ते मध्ये गेले तर धक्काच. अंगावर काटा आणणारी घटना. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

बुधवारी (ता. 4) रात्री निमगाव-देवपूर येथे धक्कादायक घटना घडली. नेहमीप्रमाणे प्रभाकर बाळू मुरडनर (वय ३२) हे जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. शेडनेटचा कागद पंजाच्या सहाय्याने फाडून आत जाण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका त्यांना वाटली. रात्री त्यांनी शेडनेटमध्ये चार शेळ्या बांधल्या होत्या. त्यांना काहीसा संशय आलाच. शेडनेटमध्ये प्रवेश करताच समोर जे दिसले त्यानंतर त्या थरकापच उडाला. बिबट्याने रात्री शेडनेटचा कागद पंजाच्या सहाय्याने फाडून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कागद न फाटल्याने त्याने शेडनेटच्या खालच्या भागातून आत प्रवेश केला. तेथे बांधलेल्या दोन शेळ्यांचा शेजारी ३० ते ४० मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात ओढून नेऊन तेथे त्यांचा फडशा पाडला. तर एक शेळी शेडनेटमध्ये मारून टाकली. 

गुरुवारी (ता. 5) सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर मूरडनर यांनी वनविभागास माहिती दिली. या घटनेत त्यांचे ४० हजारांचे नुकसान झाले. दरम्यान, वनरक्षक वत्सला कांगणे, वनमजूर मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd Test: विंडीजच्या शतकवीराची विकेट रवींद्र जडेजासाठी विक्रमी! हरभजन सिंगला मागे टाकत भारतात केला 'हा' पराक्रम

Central Railway: मध्य रेल्वेकडून दिवाळी गिफ्ट! प्रवाशांसाठी सोडणार १६६२ उत्सव गाड्या, कधी अन् कुठे? वाचा वेळापत्रक

Banana Health Benefits: केस, त्वचा आणि मन यासाठी नैसर्गिक सौंदर्याचा खजिना म्हणजे केळ!

Pune illegal dumper traffic: डंपर चालकांना माणसं मारायचा परवाना दिलाय का? दहा महिन्यात पाच जणी चिरडल्या, हप्तेखोर प्रशासनाला कधी जाग येणार?

Army Jeep Accident: भारतीय लष्कराची जीप उलटली; एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू, तर अन्य जण जखमी, कुठे घडली घटना?

SCROLL FOR NEXT