leopard was found dead base of the sonewadi fort 
नाशिक

सोनेवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला मृत बिबट्या

अजित देसाई

सिन्नर : भोजापुर खोरे परिसरात असणाऱ्या सोनेवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी आज दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेतील नर बिबट्या आढळून आला. या बिबट्याचे वय 11 ते 12 वर्षदरम्यान असून वयोमानामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.

सोनेवाडी शिवारात शेरीफटा परिसरात वनक्षेत्राच्या लगत गणिभाई शेख यांची शेतजमीन आहे. आज दि.5 दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास डोंगर पायथ्यालगत असणाऱ्या शेतात मरणासन्न अवस्थेत बिबट्या पहुडलेला असल्याचे शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे याना याबाबत माहिती दिली. 

सोनवणे यांनी वन परिमंडळ अधिकारी प्रितेश सरोदे, अनिल साळवे, वनरक्षक आकाश रूपवते, किरण गोरुडे यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली असता अकरा ते बारा वर्षे वय असणारा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मृत बिबट्यास मोहदरी येथील वन उद्यानात आणण्यात आले. तेथे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद भणगे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे पंचनामा करून मृत बिबट्यास अग्नीडाग देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

रिपोर्ट- अजित देसाई

संपादन- रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT