नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना, दिवसभरात आढळणार्या कोरोना बाधितांच्या संख्येने एक हजाराचा आकडादेखील ओलांडला होता. तब्बल पंधरा दिवसांनी जिल्ह्यात पाचशेहून कमी कोरोना बाधित आढळल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
दिवसभरात ४२९ कोरोना बाधित आढळल्याने बाधितांचा आकडा ३० हजार ४३८ झाला आहे. ३९१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे झालेल्या रूग्णांची संख्या २४ हजार ६९८ झाली आहे. ॲक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत ३८ ने वाढ झाली असून, सध्या ४ हजार ९५५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील शिंदे यांच्यासह सोमवारी (ता.२४) जिल्ह्यात सतरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
पोलिस दलातही कोरोना
मालेगाव येथे तैणात पोलिस दलातील पोलिसांनंतर नाशिक शहरातील पोलिस दलातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांत बर्यापैकी परीस्थिती नियंत्रणात ठेवण्यात दलाला यश आले होते. दरम्यान अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील शिंदे यांच्यावर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.
रुग्णांची आकडेवारी
सोमवारी झालेल्या सतरा मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील तेरा, ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिका हद्दीतील एका रूग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा ७८५ झाला आहे. दिवसभरात आढळेल्या ४२९ बाधितांमध्ये नाशिक शहरातील २७४, नाशिक ग्रामीणचे १४७, मालेगावचे सहा तर जिल्हाबाह्य दोन रूग्णांचा समावेश आहे. बरे झालेल्या ३९१ रूग्णांमध्ये नाशिक ग्रामीणचे ६१, नाशिक शहरातील ३०१, मालेगाव महापालिका हद्दीतील २६, जिल्हाबाह्य तीन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ४६६ रूग्णांचे अहवाल प्रलंबित होते. तर नाशिक महापालिकका व गृहविलगीकरणात ४७९, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात २८०, मालेगाव महापालिका व गृहविलगीकरणात ३९, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात १३ तर जिल्हा रूग्णालयात बारा संशयितांवर उपचार केले जात आहेत.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.