vishwas-nangre-patil-nashik 123.jpg 
नाशिक

"लॉकडाऊनमध्ये "ते' देवासारखे धावले मदतीला".!.आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही थोपटली पाठ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतनगर परिसरातील शिवाजीवाडीमध्ये राहणाऱ्या गर्भवतीला मंगळवारी (ता. 7) मध्यरात्रीला प्रसुती कळा झाल्या. मात्र प्रयत्न करून तिच्या नातलगांना गर्भवतीला रुग्णालयात नेण्यासाठी खासगी वाहन वा रुग्णवाहिका मिळत नव्हती. मात्र गस्तीवरील मुंबई नाका पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या शासकीय वाहनातून गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि त्याठिकाणी गर्भवतीने गोंडस नवजात बाळाला जन्म दिला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीला पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही सलाम ठोकत रिवॉर्डही जाहीर देत कौतुकांची शाबासकी दिली. 

लॉकडाऊनमध्येही पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन

वडाळारोडवर भारतनगर वसाहत असून याच परिसरात शिवाजी वाडी आहे. मंगळवारी (ता. 7) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या परिसरातील गर्भवतीला प्रसुती कळा सुरू झाल्या. तिला त्रास होऊ लागल्याने तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्‍यक होते. गर्भवतीच्या घरातील नातलगांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी खासगी वाहन वा रुग्णवाहिकाही मिळविण्याचा प्रयत्न केला. एकीकडे लॉकडाऊन तर दुसरीकडे ही अशी अवघड परिस्थिती पाहून तिचे नातलग हतबल झाले होते. कोणतीही मदत मिळण्याची शक्‍यता त्यांना दिसत नव्हती. दरम्यान, त्यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे विनयनगर बीट मार्शल पोलिस हवालदार संजय लाटे, पोलिस शिपाई अत्तार हे रात्रीच्या गस्तीवर होते. ते भारतनगर परिसरात गस्त मारत असताना, त्यांना याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी प्रसंगवधान ओळखले व मदतीला धावुन गेले. त्यांनी तात्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून मदत मागविली. यानंतर याठिकाणी गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार शिंदे, पोलिस शिपाई मुंजाळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिस शासकीय वाहनासह भारतनगर येथे पोहोचले. त्यांनी गर्भवती महिलेस शासकीय वाहनातून तिच्या नातेवाईकांसह जिल्हा रूग्णालय गाठले. जिल्हा रुग्णालयात गर्भवतीला दाखल केल्यानंतर ती सुखरूप प्रसुति होऊन गोंडस बाळाला जन्म दिला. महिलेची व तिच्या बाळाची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. 

CoronaFighter : VIDEO : "मनात भीती असते..पण कोरोनाच्या सावटाखाली सेवेचे झाड फुलवायचंय" कर्तव्यसाठी 'त्या' अनेकांच्या केअरटेकर!

आयुक्तांकडून बक्षिसी 
मुंबई नाका पोलिसांनी मंगळवारी (ता. 7) रात्री दाखविलेल्या कर्तव्य दक्षतेचे कौतुक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही केले. उपायुक्त अमोल तांबे यांनी लॉकडाऊनच्या अतिरिक्त ताण असतनाही दाखविलेल्या माणुसकीचे दर्शन व कर्तव्यदक्षतेमुळे या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT