lockdown in park Even after relaxation of restrictions
lockdown in park Even after relaxation of restrictions  SYSTEM
नाशिक

नाशिक : निर्बंध शिथिलीकरणानंतरही उद्यानात मात्र लॉकडाउनच

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यात कोरोनाकाळात (Corona) लावलेले प्रतिबंधात्मक नियम पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहे. पूर्णतः बंदी उठविल्यानंतर शहरातील पाचशेहून अधिक महापालिकेची (NMC) उद्यान मात्र अजूनही बंदच आहे. उन्हाळी सुटी (Summer vacatios) लागल्या आहेत. काही दिवसांपासून शहरात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे.

उष्णतेची लाट असल्याने दिवसभर सुटी असलेल्या बाळगोपाळांना घरात कोंडून घेण्‍याची वेळ आली आहे. त्यात या आठवड्यापासून भारनियमन (load shedding) सुरू झाले आहे. अशात घरात दिवसभर उन्हाचा कडाका सोसल्यानंतर सायंकाळी उद्यानात किंवा जल तरण तलावावर (Swimming pool) जायचे तरी महापालिकेची शहरातील सर्वच्या सर्व ५२० उद्याने बंद आहे. तरण तलाव महापालिकेने सुरू केलेले नाहीत. अशा स्थितीत घरात कोंडून घेण्याची वेळ आलेल्या बालगोपाळांची यंदाच्या उन्हाळ्यात मोठीच कुंचबणा झाली आहे. तरण तलाव सुरू करण्याचे महापालिकेच्या यंत्रणेचे नियोजन तरी सुरू आहे. पण उद्यानांबाबत मात्र कुठलाही निर्णय झालेला नाही.

महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख निवृत्त झाले आहे. महापालिकेने त्यांना पुन्हा सेवेत बोलावले असले तरी याच दरम्यान ते सुटीवर गेले आहेत. त्यामुळे शहरातील उद्यान विभागाचे कामकाज अतिरिक्त पदभार दिलेल्या अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहे. अतिरिक्त कार्यभार असल्याने धोरणात्मक निर्णय होत नाही. निवृत्ती घेऊनही पुन्हा सेवेत बोलाविल्याने संबंधित अधिकारी महापालिकेत येत नाही. त्यामुळे सध्या उद्यान विभागाच्या कामकाजाचे सगळेच आनंदीआनंद आहे. शहरात अनेक उद्यानाची कामे सुरू आहे. पण त्यातील किती कामे पूर्ण झाले, किती अपूर्ण आहे. नूतनीकरणाची ठेके दिलेल्या करारानुसार कामकाज सुरू आहे की नाही, हे तपासण्यास अधिकारी नाही. अशा स्थितीत, उद्याने सुरू होणार कधी, असा पालकांना प्रश्‍न पडला आहे.

"उद्याने सुरू झाली म्हणजे दिवसभर उन्हाच्या दाहकतेने अंगाची लाहीलाही अनुभवणाऱ्या बालकांना सायंकाळी थोडा वेळ उद्यानात फिरता येते. त्यांची खेळण्याने चिडचिड कमी होते, परंतु महापालिकेकडून धोरणात्मक निर्णय म्हणून उद्यान सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय होत नाही."

- रमाकांत गोसावी, नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT