police corona.jpg 
नाशिक

हाय रिस्क परिसरात बजावले कर्तव्य...आता जरा विश्रांती ...सलाम तुमच्या कार्याला!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मालेगावला कोरोनाच्या रेड झोनमध्येच गेल्या दोन महिन्यांपासून कर्तव्य बजावणाऱ्या 71 पोलिसांना विश्रांती देण्यात आली आहे. मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी व एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाकडून समुपदेशनानंतर त्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

समाजकल्याणच्या वसतिगृहात क्वारंटाइन
मालेगावमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. शहरातीलच काही पोलिस ठाणी रेड झोनमध्ये असल्याने तेथील पोलिस कर्मचारीही कोरोनाबाधित झाले. आतापर्यंत ग्रामीण पोलिसांसह राज्य राखीव दलातील जवान अशा 157 पोलिसांना कोरोनाची लागण झाली, तर तीन पोलिस कर्मचारी कोरोनाचे बळी ठरले आहेत. या काळात पोलिसांनी हाय रिस्क परिसरात कर्तव्य बजावले. अशा 71 पोलिस कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव येथील मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात विशेष फीव्हर क्‍लिनिक सुरू करण्यात आलेले आहे. या ठिकाणी या पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पूना रोडवरील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वारंटाइन काळात त्यांची 14 दिवस रोज वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. डॉ. योगेश पवार, डॉ. विशाल हारकर, डॉ. शशांक पगार, डॉ. विवेक कुमार, डॉ. दीपक कुमार, डॉ. अनुजा केदार, डॉ. अजय शेळके आदी प्रयत्नशील आहेत. 

हेही वाचा > नियतीचा क्रूर डाव! वाढदिवसाच्या दिवशीच तरुणाचा 'असा' दुर्देवी अंत...कुटुंबियांचा आक्रोश

मनोबलासाठी समुपदेशन 
मालेगावातील कोरोनाचा हाहाकार आणि त्यात तीन पोलिस बळी गेल्याने बंदोबस्तावरील पोलिसांच्या मनोबलावर विपरीत परिणामाची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी एसएमबीटी महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप नाईक, डॉ. विश्‍वजित कदम यांनी पोलिसांचे समुपदेशन केले, तसेच आरोग्याची काळजी, आहार, संसर्गाचा धोका टाळता यावा, सोशल डिस्टन्सिंग, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे यांसह मानसिक भीती व सकारात्मक मनःस्थिती याबाबत मार्गदर्शन केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year's Eve : भारताआधी २९ देशांत होणार नवीन वर्षाचे स्वागत, जगभरात नववर्षाचे आगमन २६ तास सुरू राहणार, काय असतो टाईम झोन ? जाणून घ्या

Gold Silver Price Today : वर्षाच्या शेवटी सोने, चांदीचा दरात घसरण होणार!, चांदी वाढली सोने दरात घट...

Emergency Case मध्ये मध्यरात्रीही न्यायालय उघडणार; CJI Suryakant यांच्या ‘या’ प्लॅनमुळे संपूर्ण न्यायव्यवस्थेत मोठा बदल!

Pune News:'हडपसरच्या तीन प्रभागातून ३४८ उमेदवारी अर्ज दाखल'; ए-बी फॉर्म वाटपात आयात उमेदवारांना प्राधान्य, सर्वच पक्षांमधून नाराजीचे सूर..

Latest Marathi News Update : उत्तर भारतात थंडीचा विमानसेवेला फटका, पुण्यात ३ उड्डाणं रद्द

SCROLL FOR NEXT