pramod mandlik.jpg
pramod mandlik.jpg 
नाशिक

बाळ दगावल्याचं दु:ख 'त्यांनी' कसंबसं पचवलं...त्यात नियतीची आणखी एक खेळी...पण अखेर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : बाळ जन्माला येण्यापूर्वीच दगावल्याचं दुःखही आम्ही नवरा-बायकोने पचवलं होतं...त्यातून कसंबसं स्वत:ला सावरलं अन् त्यात कोरोनाचा आघात...दोघेही मनोमन हादरलो. उपचारानंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला; पण पत्नीचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह...संकटामागून संकट अन् अखेर "हम साथ साथ है'चाच धीर मिळाली.

पत्नीचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह

मी प्रमोद मंडलिक मालेगाव शहर पोलिस ठाण्यात ड्यूटीवर असताना 15 एप्रिलच्या सुमारास प्रकृती बिघडली. तेव्हा सलाइन लावून ड्यूटी सुरू होती. ती सिरींज हाताला असल्याने अनेकजण संशयाने पाहात. 23 एप्रिलला रुग्णालयात दाखल झालो. दुसऱ्या दिवशी माझा व पत्नी माधुरी दोघांचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोघेही मनोमन हादरलो. मात्र पोलिस खात्यात असल्याने संकटावर मात करण्याची सवय होती. शिवाय याआधी आमचं बाळ जन्माला येण्यापूर्वीच दगावल्याचं दुःखही आम्ही पचवलं होतं. रुग्णालयात पत्नी शेजारी असल्याचा वेगळाच दिलासा होता. एकमेकांना आधार देत असतानाच माझ्या छातीत पाणी झालं. उपचारानंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला; पण पत्नीचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आला. छातीत पाणी झाल्यानं त्यावर उपचार सुरूच होते.

त्यातच 7 मेस पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आमची काही काळासाठी जणू ताटातूट झाली. फोनवर वेळीवेळी बोलून एकमेकांच्या तब्यतेची चौकशी करीत होतो. आमच्या कुटुंबात सदस्य तसे तीस; पण ते जिल्ह्याबाहेर. या काळात मोठी मदत झाली ती मित्रपरिवाराची. पोलिस प्रशासनाकडून अधूनमधून चौकशी केली जायची. पाण्याची बॉटल, फळ यायची. डोक्‍यात सतत सकारात्मक विचार ठेवायचा प्रयत्न करीत होतो. डॉक्‍टरांनी सांगितलेली पथ्ये पाळत होतो. 

अखेर 18 मेस आम्ही दोघेही ठणठणीत झालो. त्यानंतर गावी कुटुंबीयांपासून दूर गावाबाहेर क्वारंटाइन झालो. नंतर शनिवारी (ता. 30) एक तासापूर्वी घरात पाऊल टाकल्याचा वेगळाच आनंद झाला अन्‌ "सकाळ'मधून ख्यालीखुशाली विचारण्यासाठी फोन आला. आपल्या संघर्षाची कोणीतरी दखल घेतंय, ही बाब खूपच दिलासा देणारी आहे. आता मनोबल वाढलंय. घरातही सात दिवस स्वतःला क्वारंटाइन करून घेणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT