Manoj Jarange Patil Sabha esakal
नाशिक

Manoj Jarange Patil News: आरक्षण मिळाल्यावर भुजबळांना बघून घेऊ; जरांगे पाटील यांचा भुजबळांवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रवेश देण्याचा दिवस जवळ आला आहे. मराठयांच्या सर्व नोंदी सापडल्या असून आता विजयाचा दिवस जवळ आला आहे.

तोपर्यंत शांतता राखण्याचे आवाहन करत मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळांकडे बघू असर्व इशारा दिला आहे. (maratha reservation Manoj Jarange Patil sabha shenit target on Bhujbal nashik political)

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमध्ये अन्न,पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. उगाच मराठयांच्या नादाला लागू नका आम्ही शांत आहोत असा इशारा देतानाच जनतेचा पैसा खाल्ला म्हणूनच तर तुम्हाला जेलमध्ये बेसन भाकरी खावी लागली असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केला.

इगतपुरी तालुक्यातील शेणीत येथे बुधवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेला संबोधित करतांना मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करत हल्लाबोल केला.

ते म्हणाले, तू कुठे भाजी विकत होतास, कोणाचे काय करत होतास, मुंबईत काय-काय केले, कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केले याची मला माहिती आहे. तू कोणाचा बंगला बळकावला हेदेखील मला माहिती आहे.

महाराष्ट्र सदनाचा पैसा खाल्ला, महाराष्ट्रात सदनाचा पैसा हा महाराष्ट्रातील जनतेचा होता, तो पैसा तू खाल्लास, त्यामुळे तुला जनतेचा, गोरगरिबांचा तळतळाट लागला. म्हणूनच तू तुरुंगात गेलास. तिथे बेसण-भाकरी खाल्ली.

आता म्हणतो तिथे कांदाही मिळत होता. मग अजून कांदा खा. पाच किलो कांदा खा अशा शब्दांत भुजबळांचा समाचार घेतला. भुजबळ यांचे वय झाले असल्याने त्यांना काहीच सुधरत नाही. त्याला माझे सर्व काही माहित असेल तर मला देखील त्याचे सर्व काही माहित आहे.

आमचा आग्यामोहळ खूप डेंजर आहे. माझ्या नादाला लागू नको. एक सभा घेतली, पण माझ्या मुबईत जाईपर्यंत त्यातील अर्धे फुटले असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी जमलेल्या समुदायाचे कौतूक केले.

मात्र या गर्दीच्या नादात आपल्या हातून काही चूकही व्हायला नको. मराठा एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येउ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, पुन्हा समाजाची हानी होईल. आता समाजाची हानी होउ देउ नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.

२४ डिसेंबरच्या आतमध्ये राज्यातील सर्व मराठ्यांना ५० टक्कयांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार यात काहीच शंका नाही. मराठ्यांच्या ओबीसीत ३२ लाख नोंदी सापडल्या आहेत. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी दिले असते, तर जगाच्या पाठीवर मराठयांची जात नंबर एकची प्रगत जात ठरली असती असेही जरांगे म्हणाले.

...मग महाविद्यालयांना फुलेंचे नाव का नाही

तुम्हाला ओबीसी बांधवांची आणि महात्मा फुलेंची एवढी आस्था आहे. तर, मग तुमच्या एकही कॉलेजला सावित्रीबाई फुले यांचे नाव का दिले नाही. तुम्ही, लोकांना काय तत्त्वज्ञान शिकवणार, माझ्यासारख्या सामान्य घरातील लेकरावर नाही ते आरोप करत आहात.

30 ते 35 वर्ष मराठ्यांच्या जीवावर सत्ता भोगली. मराठ्यांच्या उपकाराची परतफेड तुम्ही अशा प्रकारे करत आहात का?, तुम्ही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही एकटेच 50 ते 55 टक्के मराठे आहोत.

फक्त आरक्षण मिळेपर्यंत आम्ही शांत आहोत, आमच्या वाट्याला जाऊ नका. यांच्यावर वेळीच बंधन घाला अशी सरकारला विनंती आहे, असेही जरांगे म्हणाले.

असे झाले ठराव

-प्रत्येकाच्या घरात शिवचरित्र असावे.

-प्रत्येकाच्या घरात तुकाराम गाथा असावी.

-यापुढील आंदोलने शांततेत करण्याचा निर्णय.

-महिलांनी साडी खरेदी करण्याऐवजी पुस्तक खरेदी करावे.

-प्रत्येकाने कागदपत्रांची फाईल तयारी करावी.

सरकारकडे केली ही मागणी

-मराठा समाजावर खोटे गुन्हे दाखल करू नका.

-आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नका.

-नोकरभरती केली तर आमच्या जागा रिक्त ठेवा.

-आंतरवलीत लाठीचार्ज करणारया अधिकारयांना बडतर्फ करा.

-पंधरा दिवसात केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले पण दोन महिने होउनही केसेस मागे घेतल्या नाही.

काय म्हणाले जरांगे पाटील...

-आरक्षण नसल्याने मराठयांच्या लेकरांचे नुकसान

-७० वर्षापूर्वीच हे आरक्षण मिळायला हवे होते.

-आता खेटायचं ठरवलंय तर खेटायचच

-भूजबळांना वैचारिक विरोध होता मात्र आता व्यक्ती म्हणून विरोध

-आरक्षणावर एकटं म्हतारं बसल आहे.

-अंबडच्या सभेतून भुजबळांचा वैचारिक वारसा दिसून आला.

-मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे मोठं षडयंत्र

-ज्यांची लायकी नाही त्यांचे नाव मी घेत नाही

-जनतेचा पैसा खाल्ला म्हणून जेलमध्ये गेला.

-सरकारने भुजबळांना समज द्यावी.

-आंदोलना दरम्यान मला अडकवण्याचा पुरेपुर प्रयत्न झाला.

-आरक्षणाच्या विजयाचा दिवस जवळ येतोय

-१ डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा.

-आरक्षणाची लढाई संयमाने लढायची आहे.

-गर्दीच्या नादात अतिउत्साहात येउ नका

-जीव गेला तरी चालेल एक इंचही मागे हटणार नाही.

-मरेपर्यंत मराठयांशी गद्दारी करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT