ZP Nashik news esakal
नाशिक

Nashik ZP News: निधी खर्चासाठी 15 मार्चची डेडलाइन; मुदतीत खर्च न झाल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरणार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत प्राप्त झालेला निधी खर्च वेळात व्हावा, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागप्रमुखांना १५ मार्चची डेडलाइन दिली आहे.

१५ मार्चपर्यंत निधी खर्च न झाल्यास विभागप्रमुखांना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे निधी खर्चासाठी विभागप्रमुखांची धावपळ सुरू आहे. (March 15 deadline for fund expenditure In case of non expenditure within time limit head of department will responsible Nashik ZP News)

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षातील निधी खर्चाचा बैठकीत आढावा घेतला. या आर्थिक वर्षातील ७७ टक्के निधी खर्च झाला असल्याचे सांगण्यात आले असून, ९० कोटी निधी खर्च झालेले नसल्याचे समोर आले आहे.

यातही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा केवळ ३० टक्के निधी खर्च झाला आहे. यावर मित्तल यांनी थेट नाराजी व्यक्त केली. विभागनिहाय विचार करता कृषी (४२ टक्के), आरोग्य (६०), महिला व बालविकास (६५), बांधकाम विभाग दोन (६९) हे देखील खर्चात पिछाडीवर आहे.

याबाबत, मित्तल यांनी संबंधित विभागप्रमुखांना विचारणा करत, निधी तत्काळ खर्च करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यंदा निधी अखर्चित राहता कामा नये, १५ मार्चपर्यंत सर्व विभागांचा निधी खर्च झाला पाहिजे, अशी ताकीद त्यांनी विभागप्रमुखांना दिली. निधी वेळेत खर्च करण्याबाबत सर्व विभागप्रमुखांना सांगितले असल्याचे मित्तल यांनी सांगितले.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दर सोमवारी घेणार आढावा

मुख्य लेखा व वित्त अधिकारी रजेवर असल्याने गेल्या महिनाभरात, निधी खर्चाबाबत तसेच आगामी अंदाजपत्रक तयारीसंदर्भात कोणतेही कामकाज झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गत महिनाभरात केवळ सात टक्के निधी खर्च झाला आहे.

प्रभारी पदाची सूत्रे सांभाळणाऱ्या उपमुख्यलेखा व वित्त अधिकाऱ्यांकडून फारसे कामकाज झाले नसल्याचे दिसून आले. त्यासाठी मित्तल यांनी आता दर सोमवारी निधी खर्चाचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अंदाजपत्रक वेळेत तयार करा

दर वर्षी वेळात होणारे अंदाजपत्रक महिनाभरातील लेखा व वित्त विभागातील संथ कामकाजामुळे रखडले. त्यामुळे अंदाजपत्रक वेळेत सादर होण्याची शक्यता कमी आहे.

यासाठी मित्तल यांनी सर्व विभागांनी तत्काळ माहिती सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. कोणत्याही स्थितीत यात कालापव्यय होता कामा नये, अशी ताकीदही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT