MLA Manikrao Kokate, Neighbor Simantini Kokate, All Candidates of Farmer Development Panel Speaking at the Panel Announcement for Agricultural Produce Market Committee esakal
नाशिक

Market Committee Election : आमदार कोकाटेंचे शेतकरी विकास; पॅनेलची व उमेदवारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

Market Committee Election : गेलेल्यांचा विचार नाही करायचा...त्यांना शुभेच्छा, खरेतर त्यांनी अगोदरच जायला पाहिजे होते अशी टीका आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्यावर करीत शेतकरी विकास पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. (Market Committee Election Farmer Development of MLA Kokate Announcement of Panel and Candidates nashik news)

बाजार समिती निवडणुकीच्या माघारीच्या दिवशी आज घडामोडीचे वेगवान नाट्य येथे घडले. आमदार कोकाटे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी कोकाटे यांना सोडचिट्टी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षातील माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्या गोटात प्रवेश केला अन आमदारांविरोधात शड्डू ठोकले.

याला प्रत्युत्तर म्हणून कोकाटे यांनी वरील टीका पत्रकार परिषदेत केली. त्यांनी येत्या दोन दिवसात राजीनामा न दिल्यास जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड हे त्यांना पदावरून बडतर्फ करतील असेही ते म्हणाले.

शहा या गावापासून उद्या (ता.२१)निवडणुकीचे नारळ फोडणार आहोत. नागरिकांनी आम्हाला बळ द्यावे, आमचे सर्व उमेदवार हे सर्व समाजातील समाजभिमुख आहेत असे पॅनल निर्मितीवेळी सांगितले.

माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, जिल्हाध्यक्ष आव्हाड, राजेंद्र चव्हाणके, अशोक भाबड, लक्ष्मणराव सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संदीप सांगळे व जगनशेठ खैरनार यांनी प्रवेश केल्याबद्दल आमदार कोकाटेंनी त्याचा सत्कार केला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार

सोसायटी सर्वसाधारण गटातून शशिकांत गणपत गाडे, भाऊसाहेब रामराव खाडे, अनिल दशरथ शेळके, रवींद्र सूर्यभान शिंदे, विनायक हौशिराम घुमरे, आबासाहेब विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे, महिला राखीव गटातून सिंधूबाई केशव कोकाटे,

सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर, इतर मागास प्रवर्गातून संजय वामन खैरनार, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून रामदास मारुती जायभावे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, भाऊसाहेब नाना नरोडे,

अनु.जाती-जमाती गटातून दीपक तुकाराम जगताप, आर्थिक दुर्बल गटातून जगदीश देवराम कुर्‍हे, व्यापारी गटातून जगन्नाथ गंगाधर खैरनार, विजय रामनाथ तेलंग, हमाल मापारी गटातून नवनाथ शिवाजी नेहे आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा, गणेश नाईक यांचे आदेश

यंदाच्या विसर्जन मिरवणुका होणार डीजेमुक्त! पोलिस आयुक्त कारवाईबाबत सक्त, ‘डीजे’वाले वरमले; डीजेविरोधातील असंतोषाला वाट, दर तासाला ३०० सोलापूरकरांचे मिस कॉल

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Maratha Morcha : मुंबईतील मराठा मोर्चात ‘मुस्लिम मावळा’चे बॅनर झळकले

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

SCROLL FOR NEXT