A special team including the suspect Ganesh Sharma, who was arrested on Friday in the case of drug sale. 
नाशिक

Nashik MD Drug Case: ‘एमडी’ अमली पदार्थ विक्रीत संशयित गणेश शर्मा गजाआड

सकाळ वृत्तसेवा

Nashik MD Drug Case : एमडी अमली पदार्थाच्या वितरणात पोलिसांनी शुक्रवारी (ता. १७) आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या. प्रथमेश संजय मानकर असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान आज या प्रकरणात मुंबई आणि धुळ्यात कारवाया झाल्या.

नाशिकचे पथक मुंबईत तपासात व्यस्त होते त्यामुळे मुंबई पोलिसांकडून धुळ्यात कारवाई झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (MD Ganesh Sharma suspected of drug sales arrested nashik crime news)

या ठिकाणी एक कंपनी सील करण्यात आल्याची चर्चा पोलिस पथकात होती. नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी शुक्रवारी सामनगाव परिसरातील म्हाडा बिल्डिंगजवळ राहणारा गणेश संजय शर्मा हा एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून नाशिक रोड पोलिस ठाण्यातील अंमलदार यांनी म्हाडा बिल्डिंगचे गेटसमोर अश्‍विनी कॉलनीकडे जाणारे रस्त्यालगत त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजारांचा सुमारे १२.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ हस्तगत केला. अमली पदार्थविरोधी पथकाला गुन्ह्याच्या तपासात प्रथमेश संजय मानकर याचे नाव निष्पन्न झाल्याने संबंधित गुन्ह्यात आणखी उकल होण्याची आशा आहे.

मुंबई-धुळ्यात कारवाई

या प्रकरणात पोलिसांकडून आज मुंबई आणि धुळ्यात पोलिस कारवाई झाल्याच्या चर्चा आहे. मात्र नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धुळ्यातील कारवाईबाबत मौन पाळले. गुन्हे शाखेकडून धुळ्यात कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT