Nashik Municipal Corporation Election News esakal
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुक | घराणेशाही विरोधात ‘मिशन तरुण’ अभियान

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘मिशन तरुण नाशिक’ मोहीम काही युवकांकडून चालविली जात असून निवडणुकीत प्रस्थापित व घराणेशाहीला विरोध करताना युवकांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी सर्वपक्षियांना साकडे घातले जाणार असल्याची माहिती मिशनचे मुख्य समन्वयक मुकेश गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nashik Municipal Election)

महापालिका निवडणुकीमध्ये तरुणांना संधी मिळावी, अधिक तरुण निवडून यावे व तरुणांच्या कौशल्याचा उपयोग शहराच्या विकासासाठी व्हावा या उद्देशाने मिशन तरुण नाशिक अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानांतर्गत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी या राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष यांना निवेदन दिले जाणार आहे. महापालिका निवडणुकीत अधिकाधिक तरुणांना उमेदवारी देण्याची मागणी केली जाणार आहे. लोकशाहीचे जतन करणे हे मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणुकीत मद्य, पैसा, लाभाच्या गोष्टींना मिशनने विरोध दर्शविताना जात, धर्म, प्रांत यासारख्या भावनिक मुद्द्यांना निवडणुकीत स्थान नसावे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका मिशनच्या वतीने गांगुर्डे यांनी मांडली.

मोहिमेअंतर्गत जनजागृती केली जाणार आहे. आवश्‍यकता वाटल्यास मिशन तरुणाच्या माध्यमातून तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याचे नियोजन आहे. या वेळी मिशनचे समन्वयक संदीप मोरे, रूपेश परदेशी, अतुल मोहिते, कृष्णा शिलावट, रणजित बोधक, सुमीत काळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT