MLA Rohit Power danced with the locals during the visitnashik marathi news 
नाशिक

कळवण दौऱ्यात रोहित पवार आदिवासी कलेशी एकरूप; घुंगराची काठी घेऊन धरला ताल, पाहा VIDEO

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, कळवण तालुक्यातील सप्तशृंगी देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. आमदार नितीन पवार यांना बरोबर घेऊन स्वतः गाडी चालवीत नांदुरीकडे निघाले. प्रवासात त्यांनी नितीन पवार यांच्याकडून तालुक्यातील सिंचनाचे, युवकांचे विविध प्रश्न जाणून घेतले. नांदुरी येथील पारंपरिक आदिवासी संस्कृतीच्या ‘डोंगऱ्यादेव’ या उत्सवाला भेट दिली.

उपस्थित बालगोपाळांची विचारपूस

नांदुरीहून पिंपळा येथील जागर उत्सवात सहभाग घेतला. ग्रामस्थांनी काढलेल्या ‘वारली’ चित्रशैलीतील विविध रांगोळ्यांचे निरीक्षण करून आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले. पारंपरिक आदिवासी वेशभूषेत नटलेल्या मुलींची विचारपूस करून त्यांच्या शिक्षणाबद्दलची माहिती घेतली. नृत्यात सहभागी बालगोपाळांच्या घोळक्यात आमदारांनी सहभाग घेऊन मनमुराद गप्पा मारल्या. भविष्यात काय व्हायचे आहे, कोणत्या इयत्तेत शिकतात याबाबत चौकशी केली. पिंपळे ग्रामस्थांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा आदिवासींचे पावरी पारंपरिक वाद्य देऊन सत्कार केला. आमदार रोहित पवार यांना पावरी बघून ती वाजविण्याचा मोह झाला. पावरी वादकाकडून पावरीवादनाचे धडेही घेतले आणि तालासुरात पावरीवादन केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला. 

ग्रामस्थांसोबत धरला फेर धरून ताल

पिंपळा येथून मोहबारी येथील जागरण उत्सवात ग्रामस्थांसमवेत घुंगराची काठी घेऊन फेर धरून ताल धरला. ग्रामस्थांकडून उत्सवाची सविस्तर माहिती करून घेतली. रात्री एकला नाशिककडे प्रयाण केले. आदिवासी बांधवांची कला, संस्कृती व आदरातिथ्य बघून आमदार रोहित पवार भारावले. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, जयश्री पवार, हिरामण खोसकर, धनंजय पवार, उदय जाधव, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक जगताप, राजेंद्र भामरे, राम चौरे, राजू पाटील, सुधाकर सोनवणे, डी. एम. गायकवाड, कैलास बहिरम आदी उपस्थित होते. 

मान्यवरांकडून रानभाज्यांचा आस्वाद 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी पिंपळा येथे आदिवासी परंपरेतील विविध रानभाज्यांच्या मेजवानीची व्यवस्था केली होती. आमदार रोहित पवार व सर्व मान्यवरांनी या मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेऊन, धन्यवाद दिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT