Devotee while buying ready made Modak esakal
नाशिक

पिंपळगाव बसवंतमध्ये मोदक, लाडूची रेलचेल; गणरायासाठी तयार प्रसादाला मागणी

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगांव बसवंत (जि. नाशिक) : मोदक व नैवेद्याचे पदार्थ तयार करण्यासटी हातखंडा असावा लागतो. ठरावीक महिलांनाच ते जमत असल्याने तयार नैवेद्यावर भाविक भर देत आहेत. नैवेद्याच्या पदार्थासाठी पिंपळगाव शहरातील स्वीट मार्टमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून तयार नैवेद्याला वाढती मागणी असल्याचे चित्र आहे. मोदक पेढ्याचे दर ६०० रुपये किलो, तर लाडू २०० रुपये किलो आहेत. (Modak Ladu Demand ready made prasad for Ganesha in Pimpalgaon Baswant Nashik Latest Marathi News)

विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतानंतर पिंपळगाव शहरात घरगुतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध कार्यक्रम होत आहेत. आकर्षक रोषणाईवर भर दिला आहे. उत्सवाच्या पाश्‍र्वभूमीवर गणेशाच्या नैवेद्य खरेदीलाही वेग आला आहे. यंदा मलई बर्फी, मोतीचूर लाडू, मॅंगो मोदक, पिस्ता मोदक, बुंदी लाडुचे मोदक, अशा नानाविध नैवेद्याच्या पदार्थांची रेलचेल पिंपळगावमध्ये दिसत आहे.

नैवेद्यासाठी मोदकांसह खव्याचे पेढे, गोड बुंदी, काजू बर्फी, मलई करंजी, चॉकलेट मोदकासह अनेक नवीन पदार्थ बाजारात दाखल झाले आहेत. सार्वजनिक मंडळासह घरगुती आरतीला मान मिळालेले दांपत्य तयार प्रसाद घेऊन जात आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात नैवेद्य पदार्थ विक्रीची उलाढाल वाढली असल्याचे सागर सम्राटचे संचालक मोहनलाल चौधरी यांनी सांगितले.

दहा वर्षांपूर्वी नैवेद्यासाठी लागणारे मोदक व अन्य पदार्थ घरीच बनविले जात होते, पण आता प्रत्येकाला वेळ अपुरा पडत असल्याने तयार नैवेद्य खरेदी करण्याकडे सर्वांचा ओढा सुरू आहे. तयार मोदकाचा ट्रेंड वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT