Mahavitaran App 
नाशिक

शेतकऱ्यांची वीजबील थकाबाकी थेट आमदारांना समजणार; महावितरणकडून ॲप लाँच

दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शेतीपंपाच्या बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले. त्याअंतर्गत आमदारांसाठी महावितरणने पहिल्यांदाच स्वतंत्र ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे लॉगिन केल्यानंतर आमदारांना मतदारसंघातील प्रत्येक गावची, तालुक्याची थकबाकी कळणार आहे. याशिवाय महावितरणशी संबंधित कामांची शिफारस करणे अथवा शेतकऱ्यांकडून येणाऱ्या विविध सूचना आमदार या ॲपवरून नोंदवू शकतात. 

थकबाकी वसुलीसाठी आमदारांचा हातभार

कृषी वीजपंपाच्या बिलांची थकबाकी निफाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. त्या वसुलीसाठी महावितरण व शासन विविध उपाययोजना राबविते. आता शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. त्याअंतर्गत थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सवलती दिल्या आहेत. या वसुलीसाठी अनेक घटकांचे सहकार्य घेण्याची कार्यवाही महाविकरणकडून सुरू झाली आहे. त्यापैकीच एक घटक म्हणजे आमदार. लोकप्रतिनिधींकडून केलेल्या आवाहनाला नागरिकांतून मिळणारा प्रतिसाद वीजबिलाच्या थकबाकी वसुलीसाठी उपयोगात येऊ शकतो. यामुळे आमदारांना या प्रवाहात सामावून घेतल्याचे सांगण्यात येते. याचाच भाग म्हणून महावितरणने आमदारांसाठी खास ‘एमएमईडीसीएल एजी पॉलिसी २०२०’ या नावे ॲप लाँच केले आहे.

कसे असेल हे ॲप

हे ॲप आमदारांच्या नोंदणीकृत मोबाईलवर डाउनलोड केले आहे. लॉगिन केल्यानंतर ॲपमध्ये आमदारांना आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात किती शेतकऱ्यांची थकबाकी आहे, गावात किती शेतकऱ्यांनी थकबाकी भरली याची माहिती मिळणार आहे. प्रत्येक गावात योजनेंतर्गत जमा होणाऱ्या एकूण थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम संबंधित गावातच नवीन वीजजोडणी व आवश्‍यक पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे. या निधीचा आकडाही कळणार आहे. योजनेत पारदर्शकता राहण्यासाठी ॲपचा उपयोग होणार आहे. योजनेबाबत मार्गदर्शन करण्यासह लोकांना थकबाकी भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी मेळावेही घेण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींसह आमदारांनी केलेल्या आवाहनामुळे थकबाकी वसुलासाठी मदत होत आहे. 

जाहीर झालेल्या योजनेंतर्गत थकबाकी वसुली किती झाली आणि संबंधित गावातील पायाभूत सुविधांसाठी किती निधी मिळणार, या माहितीसाठी ॲपचा उपयोग होत आहे. ॲपवरून समस्या मांडल्या आहेत. ॲपची थेट लिंक महावितरणशी जोडली गेली आहे. 
-दिलीप बनकर, आमदार, निफाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : लासलगावमध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर कोयत्याने हल्ला...

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT