municipal aqueduct started leaking nashik news esakal
नाशिक

Nashik News: महापालिका जलकुंभास गळती; शेकडो लिटर पाणी वाया

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : कथडा भागातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयास लागून असलेल्या महापालिका जलकुंभास गळती लागली आहे. रोज सकाळ, सायंकाळ शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे पाण्यावरून रान पेटलेय, तर दुसरीकडे अशाप्रकारे पाणी वाया जात असूनही महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

यंदा समाधानकारक पाऊस झालेला नाही. धरणांचीही परिस्थिती विशेष नाही. जायकवाडी धरणासाठी पाण्याची मागणी होत आहे असून, पाण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. न्यायालयीन लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जलकुंभांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. (municipal aqueduct started leaking nashik news)

ठिकठिकाणी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जुने नाशिक कथडा भागातील जलकुंभाची काही अशीच किंबहुना यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जलकुंभाच्या वरील भागास मोठी गळती लागली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. एखाद्या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याप्रमाणे जलकुंभातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज येत आहे.

आवाजावरून किती प्रमाणात पाणी वाया जात आहे, याचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवाय जलकुंभाच्या खालीच पाणी साचत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईसह दुर्गंधीस सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा प्रकारची परिस्थिती असूनही महापालिका अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जलकुंभातील बहुतांशी पाणी वाया जाऊन परिसरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होत आहे.

रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. सध्या सर्वत्र पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना, महापालिका याकडे डोळेझाक करत आहे.

रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी त्वरित महापालिकेने जलकुंभाची दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली. त्याचप्रमाणे बडी दर्गा परिसरासह बुधवार पेठ, जीपीओ, तसेच शहराच्या अन्य विविध ठिकाणच्या जलकुंभाची अशीच परिस्थिती आहे. त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे.

कचऱ्याचे आगार

जलकुंभ परिसरात पाणीगळती तर होतच आहे, परंतु गळालेल्या पाण्याने डबके साचत आहे. त्यात मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. कचऱ्याचे साम्राज्य ,तसेच रानगवत वाढल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे.

"जलकुंभाला लागलेल्या गळतीमुळे कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पुरेसे पाणी मिळत नाही. वाढलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. जलकुंभाची दुरुस्ती व परिसरात स्वच्छता करावी." -जुबेर हाश्मी, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT