Asif Shaikh blackening the name board of the commissioner in front of the hall of the municipal commissioner esakal
नाशिक

NCP Agitation: मनपा आयुक्तांच्या नामफलकाला फासले काळे! मालेगावला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

NCP Agitation : शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शहर मलनिस्सारण टप्पा-२ भुयारी गटार योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने निविदा दाखल करण्यासाठी तयार केलेल्या अटी, शर्ती आक्षेपार्ह आहेत.

ही बाब लक्षात घेता आयुक्त, जीवन प्राधीकरण व मनपा अभियंत्यांनी संगनमताने या योजनेचा ठेका हित संबंधातील व्यक्तीस मिळावा यासाठी निकृष्ट दर्जाच्या अटी शर्ती घालत मनपा आयुक्तांविरुद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार,

कमिशनखोरी असे विविध प्रकारचे आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ५) महापालिकेत जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तांच्या नामफलकाला काळे फासले. (Municipal commissioners nameplate painted black NCP movement in Malegaon nashik news)

श्री. शेख यांनी आयुक्तांवर ठेकेदारांचे धनादेश देण्यासाठी व विविध विकास कामांसाठी बजेट देताना अंदाजपत्रकीय तरतूद करण्यासाठी दहा टक्के, महिला बचत गटाच्या पोषण आहार ठेक्यासाठी पाच मनपा अधिकाऱ्यांनी पाच लाख रुपयांची मागणी आणि मुकुंदवाडीतील अतिक्रमण हटविण्यास टाळाटाळ असे विविध आरोप करत मनपा प्रशासनावर जोरदार टीका केली.

आयुक्त आज कार्यालयात असते तर त्यांच्या तोंडाला काळे फासले असते असेही ते यावेळी म्हणाले. आयुक्त अधिकाऱ्यांच्या पाठीशी कोणाचाही आशिर्वाद असो महापालिका, शहर व कर आमचा आहे. येथील उधळपट्टी व भ्रष्टाचार सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी कार्यकर्त्यांनी ‘कमिशनर मुर्दाबाद, दादागिरी नही चलेगी, चोरी चमारी नही चलेंगी’, ‘कमिशन खोरी नही चलेगी, चोर कमिशनर मुर्दाबाद’ यांसह जोरदार विविध घोषणाबाजी करत श्री. शेख यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरील नामफलकाला काळे फासले.

आंदोलनात माजी सभागृहनेते अस्लम अन्सारी, माजी नगरसेवक शकील बेग, रफीक शेख, शेख रफीक बशारत, मुजफ्फर काजी, निसार शेख आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT