Electoral Officer Fayaz Mulani speaking at the Special General Meeting of Nashik Merchants Bank esakal
नाशिक

NAMCO Merchants Bank Election: पहिल्याच दिवशी विक्रमी 194 अर्जांची विक्री; एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यासह परराज्यात कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिली दिवशी शुक्रवारी (ता. २४) विक्रमी १९४ अर्जांची विक्री झाली.

पहिल्या दिवशी सर्वसाधारण गटातून नीलेश जाजू यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, सत्ताधारी व विरोधकांकडून पॅनलनिर्मितीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. (NAMCO Merchants Bank Election Record 194 applications sold on first day Filing of application of sole candidate nashik)

दि नाशिक मर्चंट्स को- ऑपरेटिव्ह बॅंकेची विशेष सर्वसाधारण सभा बॅंकेच्या आवारात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकारी फयाज मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी दहाला कोरमअभावी सभा तहकूब करत, साडेदहाला सभेचे कामकाज सुरू झाले.

सभेत निवडणूक अधिकारी मुलाणी यांनी २१ जागांसाठी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करत असल्याची घोषणा करत अर्ज दाखल, माघारी, आचारसंहिता याबाबतची माहिती सभासदांना दिली.

गजानन शेलार यांनी वैध अर्ज तरतुदींच्या माहितीबाबत विचारणा केली. उल्हास सातभाई यांनी निवडणूक आचारसंहितेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुलाणी यांनी माहिती दिली. छाननी झाल्यानंतर लागलीच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची मागणी सभासदांनी केली.

मात्र, सहकार कायद्यानुसार ती सादर केली जाईल, असे मुलाणी यांनी स्पष्ट केले. ‘नामको’ प्रतिष्ठित बँक असून, तिचा नावलैकिक असल्याने शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन मुलाणी यांनी करत, सभा तहकूब केली.

सभेला सहाय्यक निवडणूक अधिकारी मनीषा खैरनार, आर. आर. इप्पर, निवडणूक कक्षप्रमुख अरुण ढोमसे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित यांसह विद्यमान संचालक व सभासद उपस्थित होते.

सभा संपल्यानंतर, बॅंकेत असलेल्या निवडणूक कार्यालयात अर्जविक्री व अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ७३ उमेदवारांनी तब्बल १९४ उमेदवारांनी अर्ज खरेदी केले.

यात प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष वसंत गिते, संचालक शिवदास डागा, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, गजानन शेलार, सोहनलाल भंडारी, विजय साने, हेमंत धात्रक, संतोष मंडलेचा, गणेश गिते, दिगंबर गिते, कांतिलाल जैन, धनजंय माने, प्रकाश दायमा, उल्हास सातभाई, हरिभाऊ लासुरे, सुभाष नहार आदींचा समावेश आहे.

अर्जविक्री मोठी झाली असली, तरी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. अर्ज दाखल करण्याचा १ डिसेंबर अंतिम दिवस आहे.

बैठकांना जोर

अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाल्यानंतर सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून बैठकांना जोर आला आहे. सत्ताधारी पॅनल नेतृत्वाकडून बॅंकेच्या पदाधिकारी दालनात बैठक झाली. यात उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

या वेळी इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी घेत उमेदवारीसाठी साकडे घातल्याचे बोलले जात आहे. विरोधकांकडूनही उमेदवारांचीच्या चाचपणीसाठी बैठक झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT