Nashik Crime News esakal
नाशिक

Nanavali Famous Bakery Crime : प्राणघातक हल्ल्यात संशयिताने गमावला डोळा

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : नानावली फेमस बेकरी परिसरात तीन संशयितांनी एकमेकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले आहे. त्यातील विनोद चौधरी संशयिताने मारहाणीत त्याचा डोळा गमावल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या तक्रारीवरून बुधवारी (ता. ९) परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. (Nanavali Famous Bakery Crime case Suspect lost eye in fatal attack Nashik News)

फेमस बेकरी परिसरातील रस्त्यावर विनोद श्रीकृष्ण चौधरी ऊर्फ इल्या, किशोर बाबूराव वाकोडे आणि ऋषभ दिनेश लोखंडे उर्फ डुबऱ्या या तीनही संशयितांचा जुन्या कारणातून सोमवारी (ता. ७) रात्री वाद झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संशयित किशोर वाकोडे आणि ऋषभ लोखंडे यांनी विनोद चौधरी यास खाली पाडून मारहाण केली. डाव्या डोळ्यावर दगडाचा मार लागल्याने डोळ्यातून रक्तस्राव होऊ लागला. बेशुद्ध पडल्याने कुटुंबीयांनी त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पुढील उपचारासाठी आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. उपचारादरम्यान मारहाणीत डोळा निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. बुधवार (ता. ९) विनोदची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याने त्याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात किशोर आणि ऋषभ यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

PM Narendra Modi : रायगडाच्या संवर्धनासाठी खा. नीलेश लंके यांचा पुढाकार; संसदेत पंतप्रधानांशी चर्चा!

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

Santosh Deshmukh Case: कोर्टाने नाव पुकारलं अन् सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला; आरोपींकडून वेळकाढूपणा? देशमुख प्रकरणात काय घडलं?

Mumbai: वाहतूक कोंडी सुटणार! मुंबई ते पुणे फक्त ९० मिनिटांत आणि बेंगळुरू प्रवास ५ तासांत होणार, नवीन एक्सप्रेसवेची घोषणा

SCROLL FOR NEXT