Dead Body esakal
नाशिक

नारोशंकराची घंटा : अन डेड बॉडी जेव्हा उठून बसते...

- युनूस शेख

भद्रकाली परिसरात वीज वितरण विभागाचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक वृद्ध व्यक्ती पडून होता. त्याच्या अंगावर ब्लॅंकेट टाकण्यात आले होते. दुपारच्या सुमारास वीज वितरण विभागाचे अधिकारी कार्यालयात जात असताना त्यांना ती व्यक्ती मृत झाल्याचे वाटले. (narpshankarachi ghanta When an dead body get up sakal special nashik news)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यांनी भद्रकाली पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिस ठाण्यावरून बीट मार्शल सुरेश खालकर आणि भारत शिर्के यांना माहिती देण्यात आली. दोघांनीही घटनास्थळ गाठले. त्याठिकाणी तो व्यक्ती पडून असल्याचे आढळून आले. जमलेल्या नागरिकांमध्येही तो व्यक्ती मृत असल्याची चर्चा सुरू होती.

तेवढ्यात कुणीतरी त्याची चादर ओढल्याने तो उठून बसला आणि परिसरात हास्याची लकेर उमटली. ती वृद्ध व्यक्ती जखमी असल्याने श्री. खालकर आणि श्री. शिर्के यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलिसांना फोन करणाऱ्या अधिकाऱ्यास तो व्यक्ती जीवंत असल्याचे वृत्त मिळाले.

त्यांनी पुन्हा पोलिस ठाण्यात फोन करून तो काहीही हालचाल करत नसल्याने मृत असावा म्हणून फोन केल्याचे सांगितले. नेमका घोल आण गैरसमजामुळे हा प्रकार घडल्याने पोलिस आणि अधिकारी दोघांनी विषय संपविला अन फोन ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Panvel News: उत्सव काळात स्वच्छतेचा जागर! पनवेल पालिकेची यंत्रणा रात्रपाळीमध्ये कार्यरत

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT