crime fraud news  esakal
नाशिक

नाशिक : व्यापाऱ्याचा शेतकऱ्यांना 12 लाखाला गंडा

पैशांची फसवणूक प्रकरणी फिर्याद देऊनदेखील पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा


कळवण : गेल्या चार वर्षांपासून कळवण तालुक्यातील नवी बेज, मोकभणगी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांना पोलिस यंत्रणा पाठीशी घालत असून, व्यापाऱ्यांचा ठावठिकाणा माहीत असूनदेखील कारवाई करीत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. पैशांची फसवणूक प्रकरणी फिर्याद देऊनदेखील पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी, की नवी बेज येथील चंद्रकांत भावराव पवार, माधव रामकृष्ण बच्छाव, शिवाजी पोपट पवार (मोकभणगी) येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी चांदवड येथील द्राक्ष व्यापारी तन्वीर शब्बीर शहा, अनिस शब्बीर शहा, अशपाक इसाक खान या मे. अलकरम ट्रेडिंग कंपनी, रज्जा चौक, चांदवड या फर्मचे प्रोप्रायटर नामदेव ठाकरे हे लक्ष्मी ट्रेडर्स, मार्केट यार्ड, काजी सांगवी या द्राक्ष व्यापाऱ्यांनी २२ मार्च २०१९ रोजी तिघांच्या मळ्यात जाऊन द्राक्ष पिकाचा व्यवहार केला. द्राक्षाचे पैसे हे बागेचा खुडा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत देतो, तुमच्याकडे आमचे चेक राहू द्या, आमच्यावर भरवसा ठेवा. आमचे जिल्हाभर काम चालते, असे सांगितल्यामुळे व्यापाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिघा द्राक्ष उत्पादकांनी शेतातील द्राक्ष त्यांना दिले.

द्राक्षाचा खडा करून माल घेऊन गेले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी तिघांना आश्वासनाप्रमाणे पैसे दिले नाहीत. आजपावेतो व्यापाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन वेळ मारून नेलेली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेले चेक हे दोन वेळा बाऊन्स झाले आहेत व चेक न वटल्यामुळे आम्हाला दंड झालेला आहे. चंद्रकांत पवार यांची चार लाख २३ हजार ९८१ रुपये, माधव बच्छाव यांचे चार लाख ६८ हजार ६२५ रुपये, तर शिवाजी पवार यांचे तीन लाख ३७ हजार ७६८रुपयांची फसवणूक झाली आहे. व्यापारी पैसे देत नसल्याने आमच्याकडे नातेवाईक पैशांची मागणी करीत आहेत. आम्हाला व्यापाऱ्यांकडून येत्या आठ दिवसांत पैसे न मिळाल्यास १५ दिवसांनंतर कळवण पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा तिन्ही द्राक्ष उत्पादकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT