Chief Minister Eknath Shinde and two bags that are the talk of social media. esakal
नाशिक

CM Shinde Nashik Daura : ‘सीएम’ आले अन्‌ गेले! बॅगांच्या चर्चेचा मात्र धुराळा; सोशल मीडियावर उधाण

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेल्या चार-पाच दिवसामध्ये रविवारी (ता. १३) तिसऱ्यांदा नाशिक दौर्यावर आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, रविवारी (ता.१२) अवघ्या काही तासांसाठी आलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून निघालेल्या दोन बॅगा मात्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. अगदी मुख्यमंत्र्यांच्या कपड्यांपासून ते खोके आणल्यापर्यंतची खमंग चर्चा पोहोचली. (nashik CM Eknath Shinde Nashik Visit)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेल्या चार-पाच दिवसामध्ये रविवारी (ता. १३) तिसऱ्यांदा नाशिक दौर्यावर आले. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दौर्याचीही उलटसुलट चर्चा नाशिकमध्ये होत असताना, आता नवीनच सुरू झालेल्या चर्चेने मात्र अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. मुख्यमंत्री रविवारी सायंकाळी शहर पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने उतरले.

ते उतरल्यानंतर त्यांच्या दोन अंगरक्षकांच्या हातामध्ये मोठ्या आकाराच्या ट्रॅव्हल बॅगा होत्या. अंगरक्षक त्या बॅगा घेऊन निघाले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ पाठोपाठ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्या बॅगामध्ये ‘नोटा’ असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे तो व्हिडिओ आणि त्याखाली ना-ना प्रकारच्या कमेंट करून सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आले आहे. (latest marathi news)

...अवघ्या तासा-दोन तासासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बॅगेत कपडे असावेत...

... आठ दिवसांच्या मुक्कामाच्या हिशोबाने मुख्यमंत्री नाशिकमध्ये दाखल.

.. नाशिकमध्ये सध्या पाऊस सुरू असल्याने ऐनवेळी पावसात भिजण्याची वेळ आली तर...

... गोडसेंच्या मदतीला, मुख्यमंत्री आहे दिमतीला

... मुक्काम नाशिकला, शितपेय-सकस आहार सोबतीला

अशा आशयाच्या कमेंट सोशल मीडियावर होत आहेत. अर्थात त्या बॅगेत काय आहे, हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. तसेच, खासदार राऊत यांच्या आरोपांना प्रतित्युत्तरही आलेले नाहीत. त्यामुळे चर्चा मात्र सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT