corona updates
corona updates Google
नाशिक

जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या चार हजारांच्‍या आत

अरुण मलानी

नाशिक : नव्‍याने आढळणारे कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या काही दिवसांपासून अधिक राहत आहे. तसेच यापूर्वी झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या नोंदी पोर्टलवर अपलोड होत आहेत. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत घट होत चालली असून, चार हजारांपेक्षा कमी ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण आहेत. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात तीन हजार ७७८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नव्‍याने १५५ पॉझिटिव्‍ह आढळले, तर कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या १५५ होती. तीन बाधितांचा मृत्‍यू झाला. (nashik corona updates 155 new corona patients found in district)


मंगळवारी (ता. १५) नाशिक महापालिका क्षेत्रात ९१, नाशिक ग्रामीणमध्ये ५३, मालेगाव महापालिका क्षेत्रात चार, तर जिल्‍हाबाहेरील सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तीन मृतांमध्ये दोन ग्रामीणमधील, तर एक महापालिका क्षेत्रातील आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ९३८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणच्‍या ४०५, मालेगाव महापालिका क्षेत्रातील २९९, नाशिक महापालिका क्षेत्रातील २३४ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ३६१ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ३१७ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्‍येकी एक रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमध्ये ३६, मालेगाव महापालिका क्षेत्रात सहा संशयित रुग्‍ण आढळले.



आणखी २८४ मृतांच्‍या पोर्टलवर नोंदी

यापूर्वी दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे झालेल्‍या मृत रुग्‍णांच्‍या नोंदी संकेतस्‍थळावर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी २८४ मृतांच्‍या नोंदी पोर्टलवर झाल्‍या. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १८०, नाशिक ग्रामीणमधील ९४, मालेगाव महापालिका क्षेत्रातील दोन, तर जिल्‍हाबाहेरील आठ मृतांचा समावेश आहे.

(nashik corona updates 155 new corona patients found in district)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT