Tehsildar Bahiram
Tehsildar Bahiram esakal
नाशिक

Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : नाशिकचा लाचखोर तहसीलदार बहिरम याचा धुळ्यात प्लॉट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tehsildar Bahiram Bribe Case : जमिनीच्या उत्खनन प्रकरणी १५ लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेला नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम याचा धुळ्यात चार गुंठ्याचा प्लॉट असल्याचे ‘लाचलुचपत’च्या तपासात समोर आले आहे. (Nashik corrupt Tehsildar bahiram plot in Dhule bribe news)

यापूर्वीच त्याच्या घरझडतीमध्ये ४० तोळे सोने, १५ तोळे चांदी आणि रोकड जप्त करण्यात आलेली आहे. त्याच्या मालमत्तेच्या माहितीसह बँकेचीही माहिती तपासी अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

राजूर बहुला येथील जमिनीच्या उत्खननप्रकरणी जमीनमालकास सुमारे सव्वा कोटींचा दंड आकारण्यात आला. त्याच्या फेरचौकशीचे आदेश नाशिक तहसीलदारांना देण्यात आले होते. तहसीलदार नरेशकुमार बहिरम (वय ४४, रा. कर्मयोगीनगर, अंबड) याने १५ लाखांच्या लाचेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शनिवारी (ता. ५) बहिरम यास लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. पोलिस कोठडीत असलेल्या बहिरम याच्या मालमत्तेचा लाचलुचपतच्या पथकाने केलेल्या तपासात त्याचा धुळ्यात प्लॉट आढळून आला आहे.

याशिवाय त्यांच्या मालमत्तेचा शोध घेतला जात आहे. बहिरम याची महसूल विभागात १९ वर्षांची सेवा झालेली असून, यादरम्यान त्याच्या कामकाजाविरोधात अनेक तक्रारी असून, त्याचाही तपास पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT