corona test 1_1.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत २५ टक्के कोरोना रुग्ण; तर आतापर्यंत 'इतक्या' जणांचा मृत्यू

अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात पहिला रुग्‍ण आढळल्‍यापासून सुरू असलेल्‍या तपासणी प्रक्रियेत चाचण्यांच्‍या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. सोमवार (ता. १७)पर्यंत जिल्ह्यात एक लाख एक हजार ६०४ रुग्‍णांच्या स्‍वॅब नमुन्‍याची चाचणी करण्यात आली असून, यापैकी २५ हजार २८८ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. हे प्रमाण २४.८९ टक्‍के आहे. तर ७५ हजार ११८ रुग्‍णांचा अहवाल निगेटिव्‍ह आला असून, हे प्रमाण ७३.९३ टक्‍के आहे. 

आतापर्यंत ७०४ जणांचा मृत्यू 

सायंकाळपर्यंत एक हजार १९८ अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान, दिवसभरात नवीन ८३१ रुग्‍ण आढळून आले असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या एक हजार २० असल्‍याने ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १८९ ने घट झाली आहे. पंधरा रुग्‍णांच्‍या मृत्‍यूमुळे आतापर्यंत मृतांची संख्या ७०४ झाली आहे. सोमवारी आढळलेल्‍या ८३१ नवीन रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ५८७, नाशिक ग्रामीणचे १६८, मालेगावचे ७४. तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये ७९७ नाशिक शहरातील, २१० नाशिक ग्रामीणमधील, ११ मालेगावचे, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्ण आहेत. यातून आतापर्यंत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या १९ हजार ९५१ झाली आहे. दिवसभरात झालेल्‍या पंधरा मृत्‍यूंमध्ये पाच शहरातील, आठ ग्रामीण, तर दोन रुग्ण मालेगाव महापालिका हद्दीतील आहेत. 

गृहविलगीकरणात ३८ संशयित रुग्‍ण दाखल

शहरात अशोकनगर येथील ५१ वर्षीय पुरुष, सिडको परिसरात ५८ वर्षीय, सारडा सर्कल येथील ५५ वर्षीय, मुंबई नाका परिसरातील ६३ वर्षीय, राजीवनगर येथील ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्‍यू झाला. ग्रामीण भागात जाखोरी येथील ७३ वर्षीय, सिन्नर येथील ५३ व ५२ वर्षीय, त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील ७० वर्षीय, ठेंगोडा (ता. बागलाण) येथील ५५ वर्षीय पुरुषाचा तसेच, मालेगाव तालुक्‍यातील ५८ वर्षीय, सटाणा येथील ५२ वर्षीय, कसबे सुकेणे (ता. निफाड) येथील ७० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्‍यू झाला आहे. मालेगाव महापालिका हद्दीतील ८५ व ५५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.

दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७२४, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्‍णालयात ११, जिल्‍हा रुग्‍णालयात पाच, तर नाशिक ग्रामीण रुग्‍णालये, गृहविलगीकरणात २८७, मालेगाव महापालिका हद्दीतील रुग्‍णालय, गृहविलगीकरणात ३८ संशयित रुग्‍ण दाखल झाले आहेत.  

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT